शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

काश्मीरचे पहिले मल्टिप्लेक्स पुढील महिन्यात सुरू होणार, एकाचवेळी तीन चित्रपटगृहांचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 10:27 IST

आघाडीची साखळी चित्रपटगृह कंपनी आयनॉक्सच्या भागीदारीतून या मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात येत आहे.

श्रीनगर : काश्मिरातील चित्रपट रसिक सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील. कारण, पुढच्या महिन्यात सोनवर भागात खोऱ्यातील पहिले मल्टिप्लेक्स सुरू होणार आहे. 

आघाडीची साखळी चित्रपटगृह कंपनी आयनॉक्सच्या भागीदारीतून या मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात येत आहे. यात एकूण तीन चित्रपटगृहे असतील व ५२० प्रेक्षक बसू शकतील, असे या मल्टिप्लेक्सचे मालक विजय धर यांनी सांगितले. पुढील महिन्याच्या प्रारंभी हे मल्टिप्लेक्स रसिकांच्या सेवेत रुजू होण्याची आशा आहे. 

धर यांचे श्रीनगरजवळील अथवाजन भागात दिल्ली पब्लिक स्कूल आहे. सुरुवातीला तीनपैकी दोन पडद्यांवर चित्रपटांचे प्रदर्शन सुरू होईल तर तिसऱ्या पडद्यावर ऑक्टोबरपासून चित्रपट पाहता येतील. मल्टिप्लेक्सचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, लोकार्पणापूर्वी अंतिम टप्प्यातील काम पूर्ण करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. 

उत्तर भारतातील सर्वाेत्कृष्ट चित्रपटगृह ब्रॉडवेच्या जागेवर या मल्टिप्लेक्सची उभारणी करण्यात आली आहे. हे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे क्षेत्र असून, भारतीय लष्कराच्या १५ व्या तुकडीचे मुख्यालयही जवळच आहे. (वृत्तसंस्था)

दहशतवाद्यांच्या धमकीमुळे पडदे अंधारले    १९८० च्या दशकापर्यंत खोऱ्यात डझनभर सिंगल स्क्रीन (एकल पडदा) चित्रपटगृहे होती. तथापि, दोन दहशतवादी संघटनांनी चित्रपटगृह मालकांना धमकावल्यानंतर या चित्रपटगृहांच्या पडद्यावर काळोख पसरला. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रशासनाने चित्रपटगृहे पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सप्टेंबर १९९९ मध्ये लाल चौकाच्या हृदयस्थानी असलेल्या रिगल चित्रपटगृहात दहशतवाद्यांनी ग्रेनेड स्फोट घडवून आणल्यानंतर या प्रयत्नांना धक्का बसला.     नीलम व ब्रॉडवे या चित्रपटगृहांनी रसिकांसाठी दरवाजे उघडले. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनाही चित्रपट प्रदर्शन थांबवावे लागले होते. सरकारने विभागात चित्रपट उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी नवे चित्रपट धोरण राबविण्यास सुरुवात केली असून, यात चित्रपटगृह सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcinemaसिनेमा