कलम 370 हटवण्यापूर्वी मोदींनी असा आखला होता 'प्लॅन'; काय होतं त्यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 10:46 AM2019-08-12T10:46:24+5:302019-08-12T10:48:58+5:30

जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना मिळू शकेल.

Kashmir Decision After Great Deal Of Thought Says Pm Narendra Modi | कलम 370 हटवण्यापूर्वी मोदींनी असा आखला होता 'प्लॅन'; काय होतं त्यामागचं कारण?

कलम 370 हटवण्यापूर्वी मोदींनी असा आखला होता 'प्लॅन'; काय होतं त्यामागचं कारण?

Next
ठळक मुद्देअनेक उद्योगपतींनी काश्मीरात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला गती मिळेलहा निर्णय घेताना खूप विचारविनिमय केला गेला.

नवी दिल्ली - कलम 370 हटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा जम्मू काश्मीरच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय खूप विचारविनिमय करुन घेतल्याचं सांगितले. यामुळे देशातील दुसऱ्या राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकासाला गती मिळेल. राज्यात रोजगार, गुंतवणूक वाढेल स्थानिकांची प्रगती होईल अशा शब्दात मोदींनी भावना व्यक्त केली आहे. 

या मुलाखतीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी या निर्णयासाठी भरपूर आश्वासक आहे. अनेक उद्योगपतींनी माझ्याकडे काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या घडीला आर्थिक विकास बंद दरवाजाआड होऊ शकत नाही. खुले विचार आणि अर्थव्यवस्था क्षेत्र युवकांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करतात. गुंतवणूकीमुळे रोजगार, स्थानिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकेल असं त्यांनी सांगितले. 

गुंतवणूकीसाठी काही परिस्थितीही अशी लागते की, स्थिर बाजार, कायदा-सुव्यवस्था सुरळीत लागतो. कलम 370 हटवल्यानंतर हे सर्व सुनिश्चित केलं जाईल. जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना मिळू शकेल. अशा निर्णयामुळे एक आर्थिक घडी राज्याला बसेल ज्यामुळे राज्यातील युवकांचे कौशल्य, मेहनत आणि उत्पादनासाठी चांगले परिणाम घडलेले येणाऱ्या काळात पाहायला मिळतील अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. 

युवकांना शैक्षणिक संधी प्राप्त होऊन या परिसरात त्यांना रोजगार निर्माण केला जाईल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत आयटीआय, आयआयएम, एम्स सारख्या क्षेत्रामुळे युवकांना शैक्षणिक तसेच रोजगार प्राप्त होण्यासाठी मदत मिळेल. जास्तीत जास्त सुविधा जम्मू काश्मीरमध्ये निर्माण करणे हे सरकारचं प्राधान्य असेल. राज्याचा विकास साधण्यासाठी रस्ते, नवीन रेल्वे मार्ग, एअरपोर्ट असे विकासाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. या राज्याचा विकास झाल्यास त्याला देश आणि परदेशाशी जोडण्यास मदत होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मागील सोमवारी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरातून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयाचं देशभरातून नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आले.

Web Title: Kashmir Decision After Great Deal Of Thought Says Pm Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.