काश्मिरात हिमस्खलन; चार जवान मृत्युमखी

By Admin | Updated: April 5, 2015 01:20 IST2015-04-05T01:20:21+5:302015-04-05T01:20:21+5:30

जम्मू-कश्मीरच्या लडाख क्षेत्रात लष्कराचे एक वाहन हिमस्खलनात गाडल्या गेल्याने चार जवान मृत्युमुखी पडले तर एक जवान बेपत्ता आहे.

Kashmir avalanches; Four jawans die | काश्मिरात हिमस्खलन; चार जवान मृत्युमखी

काश्मिरात हिमस्खलन; चार जवान मृत्युमखी

श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या लडाख क्षेत्रात लष्कराचे एक वाहन हिमस्खलनात गाडल्या गेल्याने चार जवान मृत्युमुखी पडले तर एक जवान बेपत्ता आहे. लष्कराच्या उत्तर कमानचे प्रवक्ते कर्नल एस.डी. गोस्वामी यांनी सांगितले की, लष्कराचे एक वाहन शुक्रवारी लेह जिल्ह्णातील दुर्गम चांगला गावात हिमस्खलनात अडकले. या वाहनातून एकूण पाच जवान प्रवास करीत होते. बचाव पथकाने त्वरित कार्यवाही करीत जवानांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन जवान घटनास्थळीच ठार झाले तर दोघांचा काही काळानंतर मृत्यू झाला.

Web Title: Kashmir avalanches; Four jawans die