करवीर पंचायतचे स्वच्छतागृह उघड्यावर!
By Admin | Updated: May 12, 2014 20:56 IST2014-05-12T20:56:38+5:302014-05-12T20:56:38+5:30
कसबा बावडा : करवीर पंचायत समितीच्या आवारात असलेल्या पुरुष स्वच्छतागृहाला बाहेरील बाजूने कसल्याच प्रकारचा आडोसा नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर करणार्यांना संकोचल्यासारखे वाटते. या स्वच्छतागृहाशेजारीच बांधकाम विभाग असून, या विभागाचे अजून या गोष्टीकडे लक्ष कसे गेले नाही, असा सवाल समितीत कामानिमित्त येणार्या नागरिकांना पडतो आहे.

करवीर पंचायतचे स्वच्छतागृह उघड्यावर!
क बा बावडा : करवीर पंचायत समितीच्या आवारात असलेल्या पुरुष स्वच्छतागृहाला बाहेरील बाजूने कसल्याच प्रकारचा आडोसा नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर करणार्यांना संकोचल्यासारखे वाटते. या स्वच्छतागृहाशेजारीच बांधकाम विभाग असून, या विभागाचे अजून या गोष्टीकडे लक्ष कसे गेले नाही, असा सवाल समितीत कामानिमित्त येणार्या नागरिकांना पडतो आहे.जिल्ात सर्वांत मोठी पंचायत समिती म्हणून करवीर पंचायत समितीकडे पाहिले जाते. शहराच्या मध्यवस्तीत असणार्या या समितीमध्ये तालुक्यातून कामानिमित्त येणार्या लोकांची नेहमीच वर्दळ असते. समितीच्या बांधकाम विभागाच्या जवळच पुरुष स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाला आडोसा नसल्याने अनेक जणांकडून त्याच्या पाठीमागील उघड्या जागेचा वापर स्वच्छतागृह म्हणून केला जातो. समितीत येणार्या-जाणार्या लोकांना हे दृश्य किळसवाणी वाटते.करवीर पंचायत समितीची इमारत सध्या ज्या जागेवर आहे त्या जागेबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. यामुळे त्या ठिकाणी बांधकाम करता येत नाही, अशी उत्तरे पंचायत समितीकडून दिली जातात.प्रतिनिधी फोटो - 11कोल बावडा01, 02