शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:10 IST

Karur Stampede: प्रचंड गर्दी आणि विजयचं सभास्थळी उशिराने झालेलं आगमन हे करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमागचं कारण असल्याचा दावा प्राथमिक तपासामधून करण्यात येत होता. मात्र विजय याच्या तमिलगा वेत्री कझगम या पक्षाने मात्र या चेंगराचेंगरीबाबत  वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाच्या सभेमध्ये चेंगराचेंगरी होऊन सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये १० मुलांचाही समावेश होता. दरम्यान, प्रचंड गर्दी आणि विजयचं सभास्थळी उशिराने झालेलं आगमन हे या चेंगराचेंगरीमागचं कारण असल्याचा दावा प्राथमिक तपासामधून करण्यात येत होता. मात्र विजय याच्या तमिलगा वेत्री कझगम या पक्षाने मात्र या चेंगराचेंगरीबाबत  वेगळीच शंका उपस्थित केली आहे. तसेच या चेंगराचेंगरीचा स्वतंत्र तपास करण्यात यावा यासाठी विजय याचा पक्ष मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर दाद मागणार आहे. ही दुर्घटना आकस्मिकपणे नाही तर पूर्ण कटकारस्थान रचून घडवून आणण्यात आली, असा आरोप टीव्हीके पक्षाने केला आहे. तसेच उपस्थित गर्दीवर दगडफेक आणि कार्यक्रम स्थळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. सेंथिलकुमार आज एक विशेष सुनावणी घेण्याची शक्यता आहे. या याचिकेमधून विजय याचा पक्ष टीव्हीकेला या चेंगराचेंगरीची चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही सार्वजनिक सभेचं आयोजन करण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विजय सभास्थळी पोहोचण्यापूर्वी नेमकी वीज गेली, तसेच अरुंद रस्ते आणि अचानक गर्दी वाढल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीमध्ये एकत्र आलेल्या लोकांची एकमेकांपासून ताटातूट झाली. तसेच महिला आणि मुलांचा श्वास गुदमरू लागला. तसेच चेंगराचेंगरीत सुमारे ४० लोकांचा बळी गेला. तर अनेक जण जखमी झाले.

या दुर्घटनेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झालेल्या विजय याला मोठा धक्का बसला आहे. घडलेल्या घटनेमुळे माझ्या मनावर मोठा आघात झाला आहे. मी खूप दु:खी आहे, असे विजयने दुर्घटनेनंतर आपल्या चाहत्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. त्याबरोबरच विजय याने या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घो।णा केली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay's party suspects conspiracy in Karur stampede, demands independent probe.

Web Summary : Vijay's party alleges conspiracy behind Karur stampede that killed 40. They suspect stone pelting, police action, and demand independent investigation in Madras High Court. Vijay announced compensation for victims.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूStampedeचेंगराचेंगरी