द्रमुक अध्यक्षपदी करुणानिधी
By Admin | Updated: January 10, 2015 00:19 IST2015-01-10T00:19:51+5:302015-01-10T00:19:51+5:30
द्रमुकचे संस्थापक अध्यक्ष सी.ए. अण्णादुराई यांच्या निधनानंतर २७ जुलै १९६९ मध्ये अध्यक्षपदी आलेल्या एम. करुणानिधी यांची पक्षाच्या नव्या अध्यक्षपदी सलग ११ व्यांदा निवड करण्यात आली आहे.

द्रमुक अध्यक्षपदी करुणानिधी
चेन्नई : द्रमुकचे संस्थापक अध्यक्ष सी.ए. अण्णादुराई यांच्या निधनानंतर २७ जुलै १९६९ मध्ये अध्यक्षपदी आलेल्या एम. करुणानिधी यांची पक्षाच्या नव्या अध्यक्षपदी सलग ११ व्यांदा निवड करण्यात आली आहे. येथे सामान्य परिषदेने शुक्रवारी करुणानिधी यांची अध्यक्षपदी निवड केली. पाच वर्षांकरिता ते पक्षाचे अध्यक्ष राहतील. के.अन्बझगण व एम. स्टॅलिन यांची अनुक्रमे सरचिटणीस, कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)