शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Karunanidhi Death Update : 'देशाने मास लिडर गमावला', राष्ट्रपती कोविंद, मोदी, पवारांसह रजनीकांतकडून श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:18 IST

Karunanidhi Death : तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - तामिळनाडूतील डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन झाले. वयाच्या 94व्या वर्षी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, रजनीकांत यांनी करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

करुणानिधी यांच्या निधनाच्या वृत्ताने मला अतिशय दु:ख झाले आहे. करुणानिधी एक सदृश वारसा सोडून जात आहेत. सार्वजनिक जीवनात अशी संपत्ती कमी मिळते. करुणानिधी यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले आहेत.करुणानिधी हे भारताचे ज्येष्ठ नेते होते, त्यामुळे आपण एका मोठ्या नेत्याला, विचारवंताला, लेखकाला आणि समाजासाठी आपले जीवन वाहून घेतलेल्या बाहुबली नेत्याला गमावल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. करुणानिधींच्या मृत्युमुळे मला अतिशय दु:ख झाल्याचे म्हणत मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.करुणानिधी वरिष्ठ नेते होते. तमिळनाडूच्या राजकारणाला त्यांनी वेगळ वळण दिल. लोकप्रिय असे नेतृत्व होतं. अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या. सामाजिक सुधार हा त्यांचा नेहमीच एजेंडा राहिला. ते एक सिद्धहस्त लेखक आणि वक्ते होते. भारताच्या राजकारणात केंद्रातील सत्तेला ज्यांची नेहमीच दखल घ्यावी लागायची असे ते नेते होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही करुणानिधींच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच एका मोठ्या तत्ववेत्त्याला आणि लेखकाला देश मुकल्याचे शिंदे यांनी म्हटले. माझ्या आयुष्यातील आज सर्वात काळा दिवस असून मी आज काय गमावलयं हे मी कधीही विसरू शकत नसल्याची भावनात्मक प्रतिक्रिया दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी दिली. तसेच मी त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही ते म्हणाले.

भारतीय राजकाणातील मास लिडर असलेल्या करुणानिधींच्या निधनामुळे दु:ख झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचेही पवार यांनी म्हटले.  

 

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडून श्रद्धांजली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून शोक व्यक्त

 

राज ठाकरेंकडून श्रद्धांजली

 

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीDeathमृत्यूSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTamilnaduतामिळनाडू