टाक्यात पडून चिमुकल्याचा करुण अंत
By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:02+5:302014-12-19T22:57:02+5:30
नागपूर : खेळता खेळता घराजवळच्या टाक्यात पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. गिीखदानमधील भीमनगर झोपडपीत आज दुपारी ११.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. अथर्व अनिल लोणारे (वय ३ वर्षे) असे मृताचे नाव आहे.

टाक्यात पडून चिमुकल्याचा करुण अंत
न गपूर : खेळता खेळता घराजवळच्या टाक्यात पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. गिट्टीखदानमधील भीमनगर झोपडपट्टीत आज दुपारी ११.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. अथर्व अनिल लोणारे (वय ३ वर्षे) असे मृताचे नाव आहे. लोणारे परिवार युवराज कोटांगळेच्या घराजवळ राहातो. घराजवळ एक टाके आहे. त्यात दोन फुटापर्यंत पाणी आहे. चिमुकला अथर्व दुपारच्या वेळी तेथे खेळत होता. खेळता खेळता तो टाक्यात पडला. डोक्यावर पडल्यामुळे त्याच्या नाकातोंडात गाळ गेला. दरम्यान, अथर्व दिसत नसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली. तो पाण्याच्या टाक्यात दिसताच त्याला तातडीने मेयोत नेण्यात आले. मात्र, मेयोच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे अथर्वच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. अथर्वचे वडील अनिल लोणारे पेंटिंग करतात तर, आई धुणीभांडी करून कुटुंबाचा गाडा रेटण्यास मदत करते. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अथर्वचा बळी घेणारे टाके कुणी खोदून ठेवले, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.---आकस्मिक मृत्यू नागपूर : गड्डीगोदाम, सुंदरबाग येथे राहणारे विजय मारोतराव नागराज (वय ३८) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. आज दुपारी ११.४५ च्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तपासणी करून डॉक्टरांनी विजय यांना मृत घोषित केले. योगिता विजय नागराज (वय ३०) यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़----