कार्तिक सदानंद गौडापासून मला दिवस गेले - कन्नड मॉडेल
By Admin | Updated: August 28, 2014 17:41 IST2014-08-28T09:42:19+5:302014-08-28T17:41:08+5:30
केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडाविरोधात एका मॉ़डेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला असून कार्तिकपासून दिवस गेल्याचे तिने सांगितले.

कार्तिक सदानंद गौडापासून मला दिवस गेले - कन्नड मॉडेल
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २८ - केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडा याच्याशी आपण गुप्तपणे लग्न केले असून त्याच्यापासून आपल्याला दिवस गेले असल्याचा आरोप दक्षिण भारतातल्या एका मॉडेलने केला आहे. कार्तिकच्या घरच्यांनी आपल्याला सून म्हणून स्वीकारावे अशी मागणी तिने केली आहे.
आपल्याला लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात रस नव्हता, परंतु कार्तिकची तशी इच्छा होती असे सांगताना आपले त्याच्याशी लग्न झाल्याचा दावा या मॉडेलने केला आहे. तर आपला या मॉडेलशी लैंगक संबंध आला नव्हता असा दावा कार्तिक गौडाने केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री असलेल्या सदानंद गौडा यांच्या मुलावर असे आरोप झाल्याने खळबळ माजली आहे.
याआधी काल रात्री या प्रकरणाची वाच्यता झाली होती. आज सकाळी एका मॉडेलने कार्तिक विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केल्याचे समोर आले. लग्नाचे आमीष दाखवत कार्तिक गौडा यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप पिडीत मॉडेलने केला.
दक्षिण भारतातील सिनेसृष्टीतील अभिनेत्री व मॉडेलने बंगळुरुतील आर टी नगर पोलिस ठाण्यात कार्तिक गौडा यांच्याविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. एका मित्राद्वारे पिडीत अभिनेत्रीची सहा महिन्यांपूर्वी कार्तिक गौडाशी ओळख झाली होती. काही दिवसांचे ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले.कार्तिक गौडा यांच्या आई व वडिलांनाही आमच्या प्रेमसंबंधांची माहिती होती असे या पिडीत मॉडेलने तक्रारीत म्हटले. कार्तिक यांच्या आईने आमच्या प्रेमसंबंधांना विरोध दर्शवला होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे. आईवडिलांच्या विरोधानंतरही मी तुझ्याशीच लग्न करीन असे सांगत कार्तिक गौडा यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोपही पिडीतेेने केला आहे. पोलिसांनी कार्तिक गौडा यांच्याविरोधात बलात्कार (कलम ३७६), फसवणूक (कलम ४२०) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत अभिनेत्रीच्या आईनेही मुलीचे कार्तिक गौडाशी प्रेमसंबंध असल्याची मान्य केल्याचे समजते. तर रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी कुटुंबाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे असा दावा केला आहे. कार्तिक गौडा यांनीदेखील पिडीत मॉडेलचे आरोप फेटाळून लावले आहे. तर लवकरच कार्तिक यांच्यासोबत झालेल्या विवाहाची व्हिडीओ सीडी जाहीर करुन जगासमोर पुरावा सादर करु असे पिडीत अभिनेत्रीने प्रसारमाध्यांना सांगितले.