नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हवाला व्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना समन्स पाठविले आहे. हे प्रकरण २-जी घोटाळ्याचा भाग असलेल्या एअरसेल-मॅक्सिस कराराशी संबंधित आहे. या आठवड्यात व्यक्तिश: वा प्राधिकृत व्यक्तीमार्फत हजर होऊन वैयक्तिक तसेच प्रतिष्ठानाशी संबंधित आर्थिक दस्तावेज सादर करावेत, असे या समन्समध्ये म्हटले आहे. गेल्या वर्षीपासून चौकशी सुरू असलेल्या या प्रकरणात कार्ती यांना समन्स बजावले जाण्याची ही पहिलीच वेळ असून, तपास अधिकारी आणि उपसंचालक राजेश्वर सिंग यांनी ते बजावले आहे. (वृत्तसंस्था)
कार्ती यांना ‘ईडी’कडून समन्स
By admin | Updated: July 6, 2016 01:43 IST