शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने दिलेली गॅरंटी पूर्ण करताना कर्नाटकचा खजिना रिकामा, शिवकुमार म्हणाले, आता योजनांसाठी पैसे नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 09:38 IST

D.K. Shivkumar: काँग्रेस सरकार यावर्षी अधिक विकासकामं करू शकरणार नाही. कारण पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या गॅरंटीची पूर्तता करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.

कर्नाटकमध्ये दणदणीत विजय मिळवत काँग्रेसनेसरकार स्थापन केले होते. मात्र सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटण्यापूर्वीच आमदारांमध्ये आपल्याच सरकारबाबत नाराजी असल्याचे समोर येत आहे. मात्र उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. पण काँग्रेस सरकार यावर्षी अधिक विकासकामं करू शकरणार नाही. कारण पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या गॅरंटीची पूर्तता करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.

काँग्रेसच्या ११ आमदारांनी मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांना लिहिलेले पत्र चर्चेत आहे. आपण २० मंत्र्यांना मतदारसंघातील विकासकामांबाबत पत्र  लिहिले होते. मात्र मंत्र्यांनी काहीही उत्तर दिलं नाही, अशी तक्रार या पत्रातून केली होती. तसेच आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, ११ आमदारांनी सिद्धारामैय्या यांना ११ आमदारांनी लिहिलेलं तक्रार पत्र हे बनावट असल्याचा दावा शिवकुमार यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडे नव्या विकास योजना सुरू करण्यासाठी कुठलाही नवा पैसा नाही आहे. कारण सरकारने निवडणुकीत दिलेल्या ५ आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पैसे वेगळे ठेवले आहेत, असे शिवकुमार यांनी सांगितले.

शिवकुमार यांनी पुढे सांगितले की, आधीच्या भाजपा सरकारने राज्याला दिवाळखोरीत लोटले आहे. आता त्यांनी केलेल्या चुका सुधारून निवडणुकीत दिलेल्या गॅरंटीची पूर्तता करण्यासाठी निधीची व्यवस्था करणे ही आमची जबाबदारी आहे.  राज्याच्या लोकांसाठी काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी जी पाच आश्वासने दिली होती. त्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला पैसे उभे करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसGovernmentसरकारMONEYपैसा