शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka election results: काँग्रेस-जेडीएसच्या हातमिळवणीमागे 'या' नेत्याचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 12:19 IST

सोनिया गांधी, देवेगौडा यांना फोन करुन युती करण्याचं आवाहन उत्तर प्रदेशातून

लखनऊ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपाच्या येडियुरप्पा आणि जेडीएसच्या कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला काँग्रेसनं पाठिंबा दिला. काँग्रेस आणि जेडीएसच्या या युतीमध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी मायावती यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि जेडीएसचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांना फोन केला होता. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, असा सल्लादेखील मायावती यांनी दिला होता. मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानं देवेगौडा यांच्या जेडीएस पक्षाशी निवडणूक पूर्व युती केली होती. बहुजन समाज पक्षानं कर्नाटकमध्ये 20 जागा लढवल्या होत्या. याशिवाय मायावती यांनी स्वत: जेडीएसच्या नेत्यांसोबत प्रचारसभा घेतल्या होत्या. या निवडणुकीत बसपच्या मतांमध्ये घट झाली. 2013 मध्ये बसपला कर्नाटकमध्ये 1.16 टक्के मतं मिळाली होती. हा आकडा यंदा 0.3 टक्क्यांवर आला. मात्र पहिल्यांदाच कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत बसपचा उमेदवार विजयी झाला. बसपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीचे निकाल येताच मायावती यांनी त्यांचे निकटवर्तीय नेते अशोक सिद्धार्थ यांना काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेण्यास सांगितलं. सिद्धार्थ यांच्याकडे पक्षाच्या कर्नाटकमधील प्रचाराची जबाबदारी होती. सिद्धार्थ यांनी गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा केल्यावर सोनिया गांधींशी संवाद साधला. यानंतर मायावती यांनी जेडीएसचे प्रमुख देवेगौडा यांच्याशी संपर्क साधत युती करण्याचा सल्ला दिला. देवेगौडा यांच्यानंतर मायावती यांनी सोनिया गांधींशी संपर्क साधला आणि जेडीएसला बाहेरुन पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला सोनिया गांधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस