Karnataka Politics: कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शनिवारी (१९ जुलै २०२५) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूरमधील एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे नाव घेण्यास नकार दिला. या कार्यक्रमाचे नाव 'साधना सामवेश' होते हा कार्यक्रम काँग्रेस सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
सिद्धरामय्या का रागावले?कार्यक्रमादरम्यान जेव्हा एका काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्र्यांना भाषणात डीके शिवकुमार यांचे नाव घेण्याची आठवण करून दिली, तेव्हा सिद्धरामय्या लगेचच संतापले. ते म्हणाले, "डीके शिवकुमार बंगळुरूमध्ये आहेत, येथे मंचावर नाहीत. आम्ही फक्त येथे उपस्थित असलेल्या लोकांचे स्वागत करतो. घरी असलेल्यांना नमस्कार कसा करायचा?" हे ऐकून काँग्रेस नेते शांतपणे त्यांच्या जागी बसले.
सिद्धरामय्या यांच्या वृत्तीवर शिवकुमार यांच्या जवळचे नेते नाराज
सिद्धरामय्या यांच्या या वृत्तीवर शिवकुमार यांच्या जवळचे नेते नाराज आहेत. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, "जर डी.के. शिवकुमार नसते तर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली नसती. किमान मुख्यमंत्र्यांनी त्यांचे नाव मंचावर घ्यायला हवे होते." काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, "शिवकुमार यांचा पक्षात फारसा प्रभाव नाही आणि त्यांच्यासोबत फक्त काही आमदार आहेत. या विधानानंतर दोन्ही नेत्यांमधील तणावाचे वृत्त माध्यमांमध्ये आले."
सिद्धरामय्या यांच्या समर्थकांचा मोठा दावा
सिद्धरामय्या यांचे समर्थक म्हणतात की, ते संपूर्ण ५ वर्षे मुख्यमंत्री राहतील. तर, शिवकुमार यांचे समर्थक असा दावा करत आहेत की, योग्य वेळ आल्यावर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होतील.