शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'आता आयपीएलप्रमाणे कर्नाटकमधील आमदारांसाठी बोली लागणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 07:46 IST

यशवंत सिन्हा यांचं भाजपा आणि कर्नाटकच्या राज्यपालांवर शरसंधान

नवी दिल्ली: आयपीएलच्या धर्तीवर आता आमदारांचा लिलाव होईल, अशा शब्दांमध्ये भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवरुन भाजपावर शरसंधान साधलं. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमत नसतानाही भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानं सिन्हा यांनी जोरदार टीका केली. 'राज्यपालांच्या निर्णयामुळे आता आयपीएलच्या धर्तीवर आमदारांचा लिलाव होईल, त्यांच्यासाठी बोली लागेल,' असं सिन्हा यांनी म्हटलं. 'भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाही. त्यांना आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भाजपा बहुमत कसं काय सिद्ध करणार? दुसऱ्या पक्षातील काही आमदार फोडूनच त्यांना बहुमत सिद्ध करावं लागले,' असं सिन्हा यांनी म्हटलं. राष्ट्रीय मंचाकडून 'घटना बचाव' आंदोलन सुरू असताना ते बोलत होते. भाजपाला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला. राज्यपाल एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागू लागले, तर लोकशाही कशी चालणार?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यशवंत सिन्हा यांनी भाजपावर शरसंधान साधलं होतं. 'भाजपा बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्याकडून निर्लज्जपणे लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न होतील,' असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. मी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, याबद्दल अतिशय समाधान वाटतं, असंही ते म्हणाले. 'लोकशाहीलाच धक्का देऊ पाहणारा पक्ष मी सोडला, याचा मला खूप आनंद आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास त्यावेळीही भाजपा हेच उद्योग करेल,' असा इशाराही त्यांनी दिला.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Yashwant Sinhaयशवंत सिन्हाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी