शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा 'शहीद' झालेला तो कार्यकर्ता आहे जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 13:43 IST

निवडणुकीचा प्रचार करताना भाजपाकडून काँग्रेसच्या काळात 'जिहादी' हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या 23 कार्यकर्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती.

बंगळुरू: सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कर्नाटकमधील राजकारण चांगलेच तापले आहे. या सगळ्या धामधुमीत प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपादेखील याला अपवाद नाही. परंतु, प्रचारातील एका घोडचुकीमुळे सध्या भाजपाची चांगलीच नाचक्की होत आहे. निवडणुकीचा प्रचार करताना भाजपाकडून काँग्रेसच्या काळात 'जिहादी' हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या 23 कार्यकर्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. भाजपाच्या उडुपीतील खासदार शोभा करंदलाजे यांनी ही यादी तयार करून केंद्रीय गृहखात्याकडे पाठविली होती. या यादीत पहिल्याच क्रमांकावर अशोक पुजारी हे नाव नमूद करण्यात आले होते. काँग्रेसच्या राजवटीत 20 सप्टेंबर 2015 रोजी त्याचा मृत्यू झाल्याचेही यादीत म्हटले होते. परंतु अशोक पुजारी जिवंत असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांना याचा पत्ता लागला आणि त्यांनी उत्तर मंगळुरूनजीकच्या असणाऱ्या खेड्यात जाऊन गाठले. यावेळी अशोक पुजारी यांनी दिलेल्या माहितीमुळे भाजपाला तोंडघशी पडल्यासारखे झाले आहे. अशोक पुजारी हे बजरंग दल आणि भाजपाचे कार्यकर्ते आहेत. 2015 मध्ये त्यांच्यावर काहीजणांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर पुजारी 15 दिवस अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होते. या सगळ्यातून ते सहीसलामत बचावले. परंतु,  भाजपाने अतिउत्साहाच्या भरात कोणतीही खातरजमा न करता अशोक पुजारी यांना शहीद म्हणून घोषित केले. हा सगळा घोळ लक्षात आल्यानंतर शोभा करंदलाजे यांनी पुजारी यांना फोन करून आपली चूक मान्य केली. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे भाजपाची चांगलीच नाचक्की झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेत काँग्रेसच्या राजवटीत आमचे 23 कार्यकर्ते शहीद झाल्याचा उल्लेख केला होता. परंतु काँग्रेस सरकारकडून हा दावा फेटाळण्यात आला होता. या सगळ्याचा मुस्लिमांशी कोणताही संबंध नसून यापैकी अनेक हत्या पूर्ववैमन्यसातून तर काही प्रकरणे ही आत्महत्येची असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे एवढे होऊनही विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक पदाधिकारी जगदीश शेणवा चूक मान्य करायला तयार नाहीत. भाजपा खोटी माहिती देणारच नाही. त्यांनी अशोक पुजारीचे नाव मृतांच्या यादीत दिले असेल तर ते बरोबरच असेल, अशी प्रतिक्रिया जगदीश शेणवा यांनी दिली. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा