शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक : सरकार टिकवण्यासाठी कुमारस्वामींची धावाधाव, भाजपाचीही मोर्चेबांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 20:19 IST

काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

बंगळुरू - काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आमदारांच्या राजीनामा नाट्यामुळे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार संकटात आले असून, सरकार टिकवण्यासाठी एच.डी. कुमारस्वामी यांनी धावाधाव सुरू केली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी कुमारस्वामी अमेरिकेहून तातडीने भारतात परतले आहेत. तसेच काँग्रेसकडूनही आपल्या असंतुष्ट आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. बंगळुरू येथे पोहोचल्यानंतर कुमारस्वामी हे पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. तसेच आमदारांसोबतही चर्चा करतील.  दरम्यान, काँग्रेसनेही आपल्या आमदारांच्या दलाची बैठक 9 जुलै रोजी बोलावली आहे. त्यासाठी पक्षाने एक सर्क्युलर प्रसिद्ध केले आहे. तसेच या बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच या बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीला माजी मुख्यमंत्री सिद्घारामय्या, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव आणि कर्नाटकचे प्रभारी के.सी. वेणुगोपाल हे उपस्थित असतील.  कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील 13 आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्याने आधीपासूनच डामाडौल अवस्थेत असलेले एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. या घडामोडींनी कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आले असून, सरकार वाचविण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची बळकावण्यासाठी भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.कर्नाटकातलं सरकार अल्पमतात आलं असून, काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीवरही संकट घोघावतंय. शनिवारी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. सर्व 10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसनं या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेस