शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 21:18 IST

bakery cakes : अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना साशंकता आल्यावर केकचे नमुने एकत्र करण्यात आले आणि केकमध्ये वापरलेल्या घटकांची तपासणी करण्यात आली.

स्थानिक पातळीवर बनवलेल्या केकमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना साशंकता आल्यावर केकचे नमुने एकत्र करण्यात आले आणि केकमध्ये वापरलेल्या घटकांची तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या केकच्या १२ नमुन्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत पदार्थ आढळून आले. 

विशेषत: रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट केकमध्ये जादा रंगांचा वापर केल्यामुळे ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. केकच्या १२ नमुन्यांमध्ये अलुना रेड, सनसेट यलो, पोनुसिया ४ आर, कॉर्मियोसिन आढळले आहेत. या कृत्रिम रंगांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या कारणास्तव रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट केकसाठी रंग वापरण्यास मनाई आहे. अधिकाऱ्यांनी केक बनवणाऱ्यांना अन्न सुरक्षा विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे. 

राज्याच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने स्थानिक बेकरींना जास्त प्रमाणात कृत्रिम रंग असलेले केक विकण्यासंदर्भात चेतावणी दिली आहे. दरम्यान, आरोग्य अधिकाऱ्यांना २३५ पैकी २२३ केकचे नमुने खाण्यासाठी सुरक्षित आढळले, तर १२ नमुन्यांमध्ये कर्करोगाचा धोका निर्माण होणारे घटक आढळून आले. बहुतेक कृत्रिम रंग जसे की  अलुना रेड, सनसेट यलो, पोनुसिया ४ आर, कॉर्मियोसिन हे रंगांचा रेड वेल्वेट आणि ब्लॅक फॉरेस्ट सारख्या केकमध्ये समावेश होता.

राज्य अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियामकाने एका निवेदनात म्हटले आहे की, कृत्रिम रंगांचा जास्त वापर केल्याने कर्करोगाचा धोका तर वाढतोच पण मानसिक आणि शारीरिक आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास के यांनी देखील बेकरी चालकांना त्यांच्या केकमध्ये हानिकारक रसायने आणि कृत्रिम रंग हे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) निर्धारित केलेल्या मानकांपेक्षा जास्त वापरण्यासंदर्भात चेतावणी दिली आहे. 

टॅग्स :foodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागKarnatakकर्नाटकcancerकर्करोगHealthआरोग्य