शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 14:36 IST

महाराष्ट्रात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी धक्कादायक दावा केला आहे.

Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत कसं मिळू शकतं असा सवाल मविआ नेत्यांनी केला. दुसरीकडे, कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली असल्याचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच हा प्रकार निवडक मतदारसंघामध्ये झाल्याचेही परमेश्वरा यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना ५० आमदारांचाही आकडा गाठता आलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीमधल्या एकट्या भाजपने १३२ जागा मिळवल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले आहेत. महायुतीने २३३ जागांवर यश मिळवत इतिहास रचला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवरुन शंका उपस्थित केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही ईव्हीएमवरुन प्रतिक्रिया देताना ते हॅक झाल्याचे म्हटलं आहे. "महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत खराब होती. हे सर्वांनाच माहीत आहे.  निवडणुकीसाठी योग्य रणनीती आखण्यातही आपण अपयशी ठरलो आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असे आम्हाला वाटले होते पण सगळेच उलटले. शनिवारी आमच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांची बैठक झाली आणि निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करण्यात आले. ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली आहे. हे प्रत्येक मतदारसंघात नाही, तर निवडक मतदारसंघामध्ये घडले. त्यांनी ईव्हीएम हॅक केल्याचं मला वाटतं आहे. हे खरे असेल तर यावर काहीही बोलण्याची गरज नाही. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत," असं कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्राच्या निकालानंतर लढा मोठा असून लोकांचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे म्हटलं आहे. "महाराष्ट्राचे निकाल अनपेक्षित आहेत. या निकालामागची खरी कारणे समजून घेण्याचा पक्ष प्रयत्न करत आहे. आम्ही आमचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी, शाहूजी, फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे आम्ही खरे प्रतिनिधी आहोत, लढा मोठा असून जनतेचे प्रश्न मांडत राहू," असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEVM Machineईव्हीएम मशीन