कर्नाटक सरकार देणार पाच रुपयात नाश्ता, दहा रुपयात जेवण!
By Admin | Updated: March 15, 2017 13:55 IST2017-03-15T13:55:58+5:302017-03-15T13:55:58+5:30
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात नाश्ता आणि जेवण मिळावे यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्याची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये सवलतीच्या दरात

कर्नाटक सरकार देणार पाच रुपयात नाश्ता, दहा रुपयात जेवण!
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 15 - वाढत्या महागाईमुळे हॉटेमध्ये साधा चहा नाश्ता करणेही प्रचंड महाग झाले आहे. मात्र अशा स्थितीत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात नाश्ता आणि जेवण मिळावे यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्याची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये सवलतीच्या दरात नाश्ता जेवण देणारी नम्मा कँटिन सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कँटिनमध्ये केवळ 5 रुपयात नाश्ता तर 10 रुपयात जेवण मिळणार आहे.
याआधी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी अम्मा कँटिनच्या माध्यमातून स्वस्तान भोजन देण्याची योजना तामिळनाडूमध्ये यशस्वीपणे राबवली होती. त्याच प्रकारची योजना कर्नाटक सरकारने आखली आहे. आज सादर झालेल्य कर्नाटक सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आता या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यास कर्नाटकवासीयांना स्वस्तात नाश्ता आणि भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.
K'taka govt allocates Rs 100 crores for setting up of Namma Canteens in Bengaluru, it'll provide breakfast for Rs.5, lunch/dinner for Rs.10
— ANI (@ANI_news) March 15, 2017