शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याची तयारी, कर्नाटक सरकारचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:11 IST

फुगवट्याविषयी केंद्राच्या अहवालाची प्रतीक्षा

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे कर्नाटक सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी वाढणार असून, सिंचन क्षेत्रातही भरीव वाढ होणार आहे.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, यासाठी राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. अलमट्टी धरणाच्या फुगवट्याविषयी केंद्र सरकार अधिसूचना जारी करत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही वेगळा निर्णय घेणार नाही. पण, धरणातील पाणीसाठा ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.दरम्यान, अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत कृष्णेला महापूर येत नाही, हे वडनेरे समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे, तरीही अलमट्टीच्या उंचीवाढीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. धरणाच्या बॅक वॉटरचा आणि धरणामुळे कथित महापूर येण्याचा अभ्यास वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. तो अहवाल आल्यानंतरच अलमट्टी धरण आणि महापुराचा संबंध स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वीच काही कार्यकर्त्यांनी धरणाची उंची वाढविण्याला महाराष्ट्र सरकारने कायदेशीर आव्हान देण्याची मागणी सुरू केली आहे.

वडनेरे यांच्या विरोधी भूमिका संभ्रमाच्या२००५, २०१९ आणि २०२१ च्या महापुरानंतर त्याचा संबंध अलमट्टी धरणासोबत मोठ्या प्रमाणात जोडण्यात येऊ लागला आहे. महापुराच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या वडनेरे समितीने अलमट्टीमुळे महापूर येतो, हा दावा नि:संशयरीत्या फेटाळला आहे. सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून अहवालात तसे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.पण, अहवाल सादर करून झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वी समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी आपलेच स्पष्टीकरण खोडून काढताना, अलमट्टीमुळे महापुराची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणGovernmentसरकारfloodपूर