शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Floor Test: येडियुरप्पांचा राजीनामा; आता काय होणार कर्नाटकात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 23:48 IST

बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव न झाल्यानं येडियुरप्पांचा राजीनामा

बंगळुरु: बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ न गाठू शकल्यानं येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आमदारांची जुळवाजुळव न झाल्यानं बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली. कर्नाटक विधानसभेत 221 आमदार असल्यानं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सरकार टिकवण्यासाठी 111 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. त्यामुळे भाजपाला आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही आमदारांची जुळवाजुळव होत नसल्यानं येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला.येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएस राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. यानंतर राज्यपालांकडून काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं जाईल. मात्र यासाठी राज्यपाल नेमका किती वेळ देतात, हे महत्त्वाचं आहे. राज्यपालांनी 104 जागा असलेल्या भाजपाला 15 दिवसांचा वेळ दिल्यानं काँग्रेस आणि जेडीएसनं थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. भाजपाकडून आमदार फोडले जाण्याची शक्यता असल्यानं काँग्रेस आणि जेडीएसचे नेते चिंतेत होते.येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळेर राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी वेळ देतील. हा कालावधी नेमका किती असेल, यावर बरंच काही अवलंबून असेल. हा कालावधी जास्त असल्यास 78 आमदार असलेल्या काँग्रेसला आणि 37 आमदार असलेल्या जेडीएसला फोडाफोडीची भीती असेल. हा कालावधी कमी असल्यास काँग्रेस आणि जेडीएसला फायदा होईल. त्यांना फोडाफोडी टाळता येईल आणि बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करता येईल. 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Yeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा