शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Floor Test: ...तर येडियुरप्पा वेगळीच खेळी खेळतील; स्वतःच म्हणतील, 'आमच्याकडे बहुमत नाही!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 12:51 IST

आज संध्याकाळी चार वाजता बहुमत चाचणी होणार

बंगळुरु : कर्नाटकमधील सत्तेच्या नाटकाचा शेवटचा अंक आज संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मुदत कमी करत आज संध्याकाळी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची खुर्ची राहणार की जाणार, हे आज संध्याकाळी ठरेल. कर्नाटक विधानसभेत 224 आमदार निवडून जातात. मात्र दोन जागांवर निवडणूक झालेली नाही. त्यात जेडीएस नेते कुमारस्वामी 2 जागांवरुन निवडून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक विधानसभेत सध्या 221 आमदार आहेत. त्यामुळे भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 111 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपाचे 104 आमदार आहेत. तर निवडणुकीनंतर एकत्र आलेल्या काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांच्या संख्येची बेरीज केल्यास ती 118 इतकी होते. कर्नाटक विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल लक्षात घेता पुढील 5 शक्यता महत्त्वाच्या ठरतात.1. बहुमत चाचणीवेळी काँग्रेस आणि जेडीएसचे कमीतकमी सात आमदार येडियुरप्पा सरकारच्या बाजूनं मतदान करु शकतात. मात्र मग ते आमदार पक्षांतर कायद्यांतर्गत दोषी ठरतील. 2. काँग्रेस-जेडीएसचे 14 आमदार शपथविधीनंतर लगेच राजीनामा देऊ शकतात. यामुळे विधानसभेतील आमदारांची संख्या 206 वर येईल. त्यामुळे बहुमताचा आकडा 104 वर येईल आणि सरकार वाचवण्यात येडियुरप्पा यशस्वी ठरतील. या परिस्थितीत आमदारांचं सदस्यत्व रद्द होईल. मग या आमदारांना भाजपाकडून पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं जाऊ शकतं. 3. बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु होताच विधानसभेत गोंधळ होऊ शकतो. विधानसभेच्या कामकाजात अडथळे आणले जाऊ शकतात. यावेळी हंगामी अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. हंगामी अध्यक्ष बोपय्या काही आमदारांचं निलंबन करु शकतात. तसं झाल्यास बहुमताचा आकडा खाली येईल. 4. काँग्रेस-जेडीएस त्यांच्या आमदारांची फोडाफोड रोखण्यात यशस्वी होऊ शकतात. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस, जेडीएस यामध्ये यशस्वी ठरल्यास येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल. 5. आपल्याकडे बहुमत नाही, हे लक्षात घेऊन बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच येडियुरप्पा राजीनामा देऊ शकतात.बहुमता चाचणीवेळी होणारी नाचक्की टाळण्यासाठी हे पाऊल उचललं जाऊ शकतं. यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी सहानुभूतीची मतंदेखील मिळवू शकतात. सर्वात मोठा पक्ष असतानाही आम्ही सत्ता सोडली, असा प्रचार त्यावेळी भाजपाकडून केला जाऊ शकतो. याआधी येडियुरप्पा यांनी अशी खेळी केली आहे. 2007 मध्ये त्यांनी असं केलं होतं. त्यावेळी येडियुरप्पा केवळ सात दिवस मुख्यमंत्री होते.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Floor Testबहुमत चाचणीYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८