शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka : कर्नाटकात पुन्हा राजकीय नाट्य रंगणार?; सिद्धरामय्यांच्या दाव्यानं चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 23:34 IST

Karnataka : सिद्धरामय्या यांनी केला मोठा दावा. त्यांच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा आलंय चर्चांना उधाण.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री (Karnataka Former Chief Minister) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या मोठ्या दाव्यानं कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) आणि जनता दल-सेक्युलर (JD-S) चे काही नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु त्यांची नावं उघड करण्यास सिद्धरामय्या यांनी नकार दिला. दरम्यान, त्यांची नावं लवकरच जाहीर केली जाऊ शकतील असंही ते म्हणाले.

कोणत्याही अटी शर्थींशिवाय जे पक्षाप्रती निष्ठा सिद्ध करतील, अशाच भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांना पक्षनेतृत्व स्वीकारेल, असं सिद्धरामय्या म्हणाले. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. "भाजप आणि जेडीएसचे काही नेते माझ्या संपर्कात आहेत. परंतु मी त्यांच्या नावांचा खुलासा करणार नाही. काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी त्यांना आमच्या पक्षावर विश्वास असायला हवा. त्यांना पक्ष नेतृत्वाला स्वीकारुनच आमच्यासोबत यावं लागेल, याशिवाय त्यांच्या कोणत्याही अटी शर्थी असू नयेत," असं ते म्हणाले."पक्षाकडूनच अंतिम निर्णय"सिद्धरामय्या यांच्याव्यतिरिक्त कर्नाटक काँग्रेसचे नेते सलीम अहमद यांनीदेखील असाच दावा केला आहे. भाजप आणि जेडीएसचे काही नेते काँग्रेसमध्ये येऊ इच्छित असल्याचं ते म्हणाले. याबाबत अंतिम निर्णय हा पक्ष आणि हायकमांड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जुलै २०१९ मध्ये राजकीय संकटजुलै २०१९ मध्ये कर्नाटकात राजकीय भूकंप आला होता. काँग्रेस आणि जेडीएसच्या सरकारच्या तब्बल २५ आमदारांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार पडलं. यानंतर भाजपला बहुमत सिद्ध करण्यात यश आलं. त्यानंतर भाजपनं सरकार स्थापन केलं आणि बीएस येडियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले. परंतु नंतर येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा बसवराज बोम्मई यांच्या हाती सोपवण्यात आली. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपा