शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

"मुस्लिमांना शांततेने आणि सन्मानाने जगू द्या", येडियुरप्पा यांच्याकडून जातीय तणाव संपवण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:47 IST

B S Yediyurappa : येडियुरप्पा यांनी हे विधान श्री राम सेनेच्या चार कथित सदस्यांनी धारवाडमध्ये मुस्लिम समाजातील फळ विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्यानंतर केले  आहे.

बंगळुरू : सध्या अनेक घटनांमुळे कर्नाटक चर्चेत येत आहे. हिजाब आणि हलाल प्रकरणानंतर आता कर्नाटकात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. येथील मुस्लिम व्यावसायिकांवरही मंदिराबाहेर हल्ले होऊ लागले आहेत. दरम्यान, मंदिरासमोरील मुस्लिम व्यापाऱ्यांच्या दुकानांची तोडफोड झाल्याची घटना समोर आल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुस्लिमांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायांना लक्ष्य करण्याऱ्या हिंदू संघटनांच्या मोहिमेवर त्यांनी टीका केली आहे. मुस्लिमांना शांततेने आणि सन्मानाने जगू द्या, असे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. दरम्यान, येडियुरप्पा यांनी हे विधान श्री राम सेनेच्या चार कथित सदस्यांनी धारवाडमध्ये मुस्लिम समाजातील फळ विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्यानंतर केले  आहे. तसेच, हिंदुत्ववादी संघटनांना अशा कारवाया थांबवण्याचे आवाहन येडियुरप्पा यांनी केले आहे.

येडियुरप्पा म्हणाले, "हिंदू आणि मुस्लिम एकाच आईची मुले म्हणून एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे. काही समाजकंटक यात अडथळा आणत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही आश्वासन दिले आहे. किमान यापुढे तरी अशा अनुचित घटना घडू नयेत आणि आपण एकजूट राहायला पाहिजे. अशा कृत्यांमध्ये सहभागी लोकांनाही रोखण्यासाठी आवाहन करणार आहे."

अनेक संघटनांकडून बहिष्कार घालण्याची मागणी कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील मंदिरांजवळील मुस्लिम समुदायाच्या लोकांच्या दुकानांवर बंदी घालण्याची, हलाल मांसावर बहिष्कार घालण्याची आणि फळांच्या व्यापारातील मुस्लिमांची मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर मशिदींमधील लाऊडस्पीकरवरही कारवाईची मागणी होत आहे. याशिवाय, अनेक संघटनांनी मुस्लिम कारागिरांनी बनवलेल्या मूर्तींवर आणि या समुदायाच्या सदस्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या टॅक्सी आणि ऑटोवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटक