शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकी पेच कायम; सत्तावाटपाचे सूत्र ठरले, पण डी. के. शिवकुमार अडून बसले! ठेवल्या 2 मोठ्या मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 06:10 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन मागण्यांवर अडून बसल्याने याबाबत घोषणा होऊ शकलेली नाही. 

आदेश रावल -

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयानंतर आता राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा वाद मिटला असला तरी काही पेच कायम आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोन मागण्यांवर अडून बसल्याने याबाबत घोषणा होऊ शकलेली नाही. 

पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करावे व त्यापुढील तीन वर्षे डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, असा फॉर्म्युला श्रेष्ठींनी तयार केला आहे. यासाठी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवण्यास शिवकुमार तयार झाले आहेत. परंतु त्यांना भीती आहे की, सिद्धरामय्या दोन वर्षांनी मुख्यमंत्रिपद सोडतील की नाही? नंतर वाद उद्भवू नये, यासाठी हा फॉर्म्युला आताच जाहीर करावा, अशी अट शिवकुमार यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर ठेवली आहे.

शिवकुमार यांची दुसरी मागणी आहे की, उपमुख्यमंत्री २-३ नव्हे, तर केवळ आपल्यालाच करावे. दोन-तीन उपमुख्यमंत्री केले जाण्याची चर्चा असून, ते त्यांना मान्य नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, तुमची मागणी मान्य केली आहे. तथापि, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या वाटपाची बाब जाहीर करण्यात येते की नाही, यासाठी शिवकुमार यांचा संघर्ष आहे.

बंद खोलीतील समझोता का नको? -  डी. के. शिवकुमार यांनी छत्तीसगडचे उदाहरण देत म्हटले आहे की, भूपेश बघेल व टी. एस. सिंह देव यांच्यात अडीच-अडीच वर्षांचा समझोता झाला होता. -  परंतु हा समझोता बंद खोलीत झालेला असल्यामुळे भूपेश बघेल यांनी तो मानण्यास नकार दिला. त्यामुळे शिवकुमार यांचे मत आहे की, हा फॉर्म्युला जाहीर करावा. -  परंतु संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासाठी इन्कार केलेला आहे. वेणुगोपाल यांचे म्हणणे आहे की, यामुळे काँग्रेस श्रेष्ठी व मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा कमी होईल.

अटी काय?फॉर्म्युला आताच जाहीर केला पाहिजेकेवळ एकच उपमुख्यमंत्री नेमावाबंगळुरुमध्ये सिद्धरामय्या यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस