शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections: हद्द झाली राव... सकाळी भाजपाचं 'कमळ', दुपारी काँग्रेसचा 'हात', संध्याकाळ होताच बदलली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 12:08 IST

चोवीस तासांमध्ये तीनवेळा आमदारानं निष्ठा बदलली

बंगळुरु: कर्नाटक विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं अपक्ष आमदारांसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या परिस्थितीमुळे अपक्ष आमदारांना प्रचंड 'भाव' मिळतो आहे. अपक्ष आमदार आर. शंकर यांनी तर 24 तासांमध्ये तीनवेळा त्यांच्या निष्ठा बदलल्या आहेत. बुधवारी सकाळी भाजपा नेत्यांसोबत दिसलेले शंकर सूर्य मावळताच काँग्रेससोबत गेले. रात्र होताच ते पुन्हा भाजपाकडे आले आणि आज सकाळी काँग्रेस नेत्यांसोबत भाजपाविरोधात विधानभवन परिसरात आंदोलन करताना दिसले.माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या आर. शंकर यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं. यानंतर त्यांना भाजपनं तिकीट देऊ केलं. मात्र ते नाकारत त्यांनी केपीजेपीकडून निवडणूक लढवली. शंकर यांनी रानेबेन्नूर मतदारसंघातून काँग्रेस नेते आणि तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष के. बी. कोलीवाड यांचा पराभव केला. तब्बल 260 कोटींची संपत्ती असलेल्या शंकर यांना सिद्धरामय्या यांचा पाठिंबा होता. त्यामुळेच सिद्धरामय्या यांनी आपल्यासाठी प्रचार केला नाही, असा आरोप कोलीवाड यांनी केला. कोलीवाड यांचा पराभव करणारे शंकर काल सकाळी भाजपा नेते येडियुरप्पा यांच्यासोबत होते. त्यानंतर दिवस मावळताच ते काँग्रेस नेत्यांसोबत दिसले. रात्री त्यांनी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. मात्र गुरुवारचा दिवस उजाडताच त्यांनी पुन्हा निष्ठा बदलली आणि काँग्रेस नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसत भाजपाविरोधात घोषणाबाजीदेखील केली.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस