शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

Karnataka Elections 2023: ‘यंदा डबल इंजिन चोरीला गेले’, कर्नाटकातून राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 18:33 IST

Karnataka Assembly Elections 2023: 'तिकडे मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे अन् पंतप्रधान-गृहमंत्री इकडे फिरत आहेत.'

Rahul Gandhi Attack On BJP: कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर उद्या(दि.8) प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद दाखवत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी राज्यातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना भाजपवर हल्लाबोल केला.

भारत जोडो यात्रेबाबत ते म्हणाले की, आम्ही यात्रा काढली, कारण आम्हाला भारत आणि कर्नाटक एकत्र करायचे होते, द्वेष संपवायचा होता. तर, भाजपवर टीका करताना ते म्हणाले, यावेळी कर्नाटकात डबल इंजिन चोरीला गेले आहे. कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितले की, राज्यात सर्वत्र 40 टक्के कमिशन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची अडीच हजार कोटींना विकली जात आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान, सांगा कोणत्या इंजिनला किती मिळाले. कर्नाटकात येऊन पंतप्रधान म्हणतात की, काँग्रेसने 91 वेळा त्यांना शिवीगाळ केली. तुमचा आणि गौतम अदानी यांचा संबंध काय, असा प्रश्न मी तुम्हाला लोकसभेत विचारला, तेव्हा मी तुम्हाला भ्रष्टाचारावर प्रश्न विचारला, तेव्हा मला लोकसभेतूनच अपात्र ठरवण्यात आले, असेही राहुल म्हणाले.

मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख राहुल गांधी यांनीही आपल्या जाहीर सभेत मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख केला. मणिपूरला आग लागली आहे, लोक मारले जात आहेत, पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना काही देणेघेणे नाही, ते इकडे कर्नाटकात प्रचार करत बसले आहेत. द्वेषाच्या राजकारणामुळे आज मणिपूर जळत आहे. या द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही 'भारत जोडो यात्रा' सुरू केली होती आणि हीच आमची विचारधारा आहे. आमच्या रोड शोमध्ये सर्व नेते एकत्र उभे राहिलेले दिसतात, तर मोदीजींच्या रोड शोमध्ये बोम्मई जी, येडियुरप्पा जी गाडीच्या बाहेर थांबतात. मोदीजी गाडीतून फिरतात, इतर नेते रस्त्यावरून चालतात, असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी