शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

Karnataka Assembly Elections 2018 : कर्नाटक निवडणुकीचे रण पेटले! दलितांच्या प्रश्नावरून मोदी-राहुल गांधी आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:13 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे रण पेटले असून, प्रचाराला नवी धार आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित कार्ड बाहेर काढून काँग्रेसवर टीका केली तर राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्हिडीओ टाकून भाजपाचे दलितांबद्दल प्रेम कसे बेगडी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे रण पेटले असून, प्रचाराला नवी धार आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित कार्ड बाहेर काढून काँग्रेसवर टीका केली तर राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर व्हिडीओ टाकून भाजपाचे दलितांबद्दल प्रेम कसे बेगडी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही मोदींवर पटलवार करत, प्रचाराची ही भाषा पंतप्रधानपदावर असलेल्या नेत्याला शोभत नसल्याचा चिमटा काढला.मतांसाठी काँग्रेस साजरी करते सुलतानांच्या जयंत्याचित्रदुर्ग (कर्नाटक): काँग्रेस फक्त मतपेट्यांच्या राजकारणासाठीच सुलतानांच्या जयंत्या साजऱ्या करीत आहेत, असा हल्ला करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजात फूट पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष इतिहासाला विपरीत रूप देत आहे, असा आरोप केला. मोदी म्हणाले की, मतपेट्यांच्या राजकारणापायी वीरा मदकारी आणि ओनाके ओबाव्वा यांचा विसर पडला. परंतु, सुलतानांच्या जयंत्या मात्र साजºया केल्या जात आहेत. सिद्धरामय्या यांनी टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती.मोदींची टीका खालच्या पातळीचीबंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी खालच्या पातळीवर जाऊन तसेच वैयक्तिक टीका करीत आहेत, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी केला. पंतप्रधानपदी बसलेल्या माणसाच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. ते सभ्य भाषेत बोलतील अशी आमची अपेक्षा होती. कोणताही सुसंस्कृत माणूस, अशा भाषेत बोलणार नाही, असा टोलाही सिद्धरामय्या यांनी लगावला.केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल मोदी जनतेला काही सांगतील, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या कारभारावर टीका करतील, अशी अपेक्षा होती. पण मोदी वैयक्तिक टीका करून क्षुद्र मनोवृत्तीचे दर्शन घडवत आहेत. माझ्याविरोधात काही पुरावे असतील तर त्यांनी जनतेसमोर मांडावेत.दलितांनी तळातच राहावे ही भाजपाची इच्छा - राहुल गांधीनवी दिल्ली : भाजपा-संघाच्या दलितविरोधी भूमिकेवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी व्हिडीओच्या माध्यमातून प्रहार केला. दलितांनी कायम तळागाळातच राहावे अशीच या फॅसिस्ट विचारांच्या संघटनांची इच्छा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपा व संघाच्या नेत्यांनी जी दलितविरोधी विधाने केली आहेत त्याचा समाचार व्हिडीओत आला आहे. देशात दलितांवर होणाºया अत्याचारांचे प्रमाण वाढले असून त्याविषयी मोदी चकार शब्द काढत नाहीत याबद्दलही राहुल यांनी टीका केली.समाजमाध्यमांवर असेच सक्रिय राहा - शशी थरूरराहुल गांधी यांनी टिष्ट्वटरद्वारे लोकांशी असाच संपर्क ठेवावा, असे आवाहन शशी थरूर यांनी केले.कर्नाटकात प्रचारासाठी सोनिया गांधी जाणारतब्येतीच्या कारणामुळे प्रचारापासून दूर राहणाºया सोनिया गांधी कर्नाटकात प्रचारासाठी उतरणार आहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी