शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Karnataka Election Results : 'असं' असेल कर्नाटकमधील सत्तेचं समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 16:36 IST

सध्या कर्नाटकमध्ये त्रिशंकू स्थिती

बंगळुरु: भाजपानं कर्नाटकमध्ये शानदार विजय मिळाला आहे. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश येताना दिसतं आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा, तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष सध्या सत्ता स्थापन करण्यासाठी जुळवाजुळव करताना दिसत आहेत. 

सत्तेचे समीकरण - 1: धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा, काँग्रेस-जनता दल सरकारअनेक वृत्तवाहिन्यांनी त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तवली होती. कर्नाटकमधील स्थिती तशीच काहीशी होताना दिसते आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत असला, तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकतात. काँग्रेसनं त्यासाठी जेडीएसला पाठिंबादेखील दिला आहे. जेडीएसपेक्षा मोठा पक्ष असूनही काँग्रेसनं मुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसची ही खेळी यशस्वी ठरल्यास त्यांना भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल. 

सत्तेचे समीकरण - 2: भाजपा-जेडीएस युती पुढील निवडणूक आणि सत्ताधारी पक्षासोबत राहण्याचे फायदे लक्षात घेता जेडीएस भाजपासोबत जाऊ शकतो. काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. भाजपा जवळपास शंभरहून अधिक जागा जिंकत असल्यानं त्यांच्याकडून जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही. मात्र भाजपाकडून जेडीएसला महत्त्वाची मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. याशिवाय भाजपा केंद्रात सत्तेत असल्यानं जेडीएसला दिल्लीतदेखील फायदे मिळू शकतात. भाजपासोबत गेल्यास त्याचा फायदा जेडीएसला पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही होऊ शकतो. 

सत्तेचे समीकरण - 3: भाजपा सत्तेत, काही आमदार अनुपस्थितभाजपाला सत्ता स्थापन करायची असल्यास छोटे पक्ष आणि अपक्ष यांची मदत घेता येऊ शकते. यासाठी काही आमदारांना बहुमत सिद्ध करतेवेळी अनुपस्थित राहण्याची विनंती भाजपाकडून केली जाऊ शकते. आठ ते दहा आमदार अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा आकडादेखील कमी होईल. त्यामुळे भाजपाला सत्ता स्थापन करता येऊ शकेल.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८congressकाँग्रेसBJPभाजपा