शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Karnataka election results 2018: ...तर भाजपाला कर्नाटकमध्ये बहुमत मिळालं असतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 10:19 IST

स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची संधी थोडक्यात हुकली

बेंगळुरु: कर्नाटकात मतमोजणीच्या सुरुवातीच्या काळात भाजपा स्पष्ट बहुमतासह सत्तेत येईल अशी शक्यता वाटत होती. मात्र भाजपा १०४ जागांवरच जाऊन थांबल्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी ८ जागा भाजपाला कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळेच काँग्रेस आणि जदसे यांनी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या.कालच्या मतांच्या आकडेवारीकडे पाहिले तर भाजपा काही जागांवर निसटत्या मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते. किमान १० जागांवर भाजपाचा ३००० पेक्षा कमी मतांनी पराभव झाला आहे. या जागांवर जरा जास्त लक्ष दिले असते तर येथे भाजपाला विजय मिळवता आला असता. असे घडले असते, तर कर्नाटकच्या नव्या सरकारच्या स्थापनेचे नाटक लांबले नसते. रायचूर जिल्ह्यात मास्की येथे भाजपाच्या बसण्णागौडा तुर्वीहाळ यांचा केवळ २१३ मतांनी पराभव झाला आहे. येथे काँग्रेसचे प्रतापगौडा पाटील विजयी झाले. त्याबरोबरच सहा जागांवर भाजपाचा २००० पेक्षा कमी मतांनी पराभव झाला आहे. या जागा भाजपाला कदाचित सत्तेच्या जवळ घेऊन गेल्या असत्या. चिकमगळूर जिल्ह्यातील श्रृंगेरी मतदारसंघात विजयी होण्याचा भाजपाला पूर्ण विश्वास होता मात्र तेथे डी. एन. जीवराज यांना पराभव स्वीकारावा लागला. तसेच सीमाभागात अथणी येथेही लक्ष्मण सवदी विजयी होतील अशी भाजपाला खात्री होती. मात्र तेथेही भाजपाचा निसटता पराभव झाला. खुद्द बदामीमध्येही काँग्रेसचा कसाबसा विजय झाला. चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभूत झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बदामीने आधार दिला. त्यामुळे त्यांची आमदारकी कायम राहिली. भाजपाच्या बी. श्रीरामलू यांनी सिद्धरामय्या यांना कडवी लढत दिली. मात्र अखेर अटीतटीच्या लढतीत सिद्धरामय्या यांचा विजय झाला.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह