शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election: ‘भगवान राम उत्तर प्रदेशचे तर हनुमान कर्नाटकचे’; निवडणूक प्रचारात CM योगींची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 15:02 IST

सीएम योगी आदित्यनाथ कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत.

Karnataka Election: कर्नाटक निवडणूक अगदी जवळ येऊन ठेवली आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. भाजपनेही आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रचार वाढवला आहे. यासाठी भाजपचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील अतिशय सक्रियपणे प्रचार करत आहेत. आज त्यांनी प्रचारादरम्यान उत्तर प्रदेश आणि कर्नाटकाचे नाते सांगितले. 

यावेळी बोलताना योगींनी उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचे नाते रामायण काळापासून असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'भगवान श्री राम भगवान उत्तर प्रदेशचे आहेत आणि हनुमानजी कर्नाटकचे आहेत.' यावेळी त्यांनी युपीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरही भाष्य केले. 'आज यूपीमध्ये कुठेच कर्फ्यू नाही, दंगल नाही. यूपीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे. आमच्या कार्यकाळात यूपीमध्ये एकही दंगल झालेली नाही. आमच्या डबल इंजिन सरकारने पीएफआयवर बंदी घातली, पण काँग्रेस पीएफआयला पाठिंबा देण्याचे काम करते.'

मुस्लिम आरक्षणावर सीएम योगी म्हणालेमुख्यमंत्री योगी यांनी यावेळी मुस्लिम आरक्षणावरही भाष्य केले. 'कर्नाटकातील डबल इंजिन सरकारने मुस्लिम आरक्षण रद्द केले, ते गरीब आणि मागासांमध्ये विभागले. भारत धर्माच्या आधारावर आरक्षणाचा विचार करू शकत नाही. आम्ही पुन्हा भारताचे विभाजन करण्याचा विचार करू शकत नाही. आम्ही सुरक्षा आणि समृद्धीची हमी देऊ शकतो,' असेही ते म्हणाले.

भाजपसाठी कर्नाटकचा माग्र कठीण कर्नाटक निवडणुकीचा मार्ग भाजपसाठी अवघड दिसत आहे. प्रत्येक सर्वेक्षणात काँग्रेसचीच आघाडी पाहायला मिळत आहे. मात्र, भाजपने कर्नाटकात स्टार प्रचारकांची फौज उतरवली आहे. योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेवर ठळकपणे भाष्य केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही जोरदार प्रचार केला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा