शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

लिंगायतांना बाजूला केले, भाजपने राज्य गमावले; येदियुरप्पा, शेट्टर, सवदींचे खच्चीकरण पडले महागात

By श्रीनिवास नागे | Updated: May 14, 2023 07:48 IST

लिंगायतांची लोकसंख्या १७ टक्के असून, १४ जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे.

बंगळुरु : माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या लिंगायत समाजाच्या ‘पॉवरफुल’ नेत्यांना बाजूला करणे भाजपला भोवले. स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याचा प्रस्ताव फेटाळण्याच्या  भूमिकेचाही फटका बसल्याचे दिसते. 

लिंगायतांची लोकसंख्या १७ टक्के असून, १४ जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव आहे. भाजपने येदियुरप्पा आणि शेट्टर यांना वयाचे कारण देत बाजूला केले होते. पण, येदियुरप्पा सोबत नसतील तर लिंगायत मते काँग्रेसकडे वळू शकतात, याची जाणीव झाल्याने भाजपने नंतर त्यांना काही जबाबदारी दिली. परंतु त्यांचे खच्चीकरण स्पष्ट दिसून आले. तिकीट नाकारल्याने शेट्टर व सवदी काँग्रेसमध्ये गेले. भाजपने मुस्लिमांचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करून लिंगायत व वक्कलिगांना विभागून दिले. पण, स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्याऐवजी भाजपने हिंदुत्वावर भर दिला. लिंगायतांऐवजी सगळे हिंदू एकत्र करून राजकारण करू, अशी जाहीर भूमिका घेतली. परिणामी, लिंगायत समाजाची नाराजी वाढली.

मुस्लिमांचे ध्रुवीकरण, काँग्रेसला फायदामुस्लीम समाजाचे चार टक्के ओबीसी आरक्षण रद्द करणे, सरकार पुन्हा आल्यास राज्यात कट्टर हिंदुत्वाचे ‘योगी मॉडेल’ राबविण्याची घोषणा यामुळे १३ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांत भाजपबद्दलचा रोष वाढत गेला. बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरल्यानंतर भाजपने बजरंग दलाचे जोरदार समर्थन केले, त्यामुळे मुस्लीम मतांचे आपोआपच ध्रुवीकरण झाले. जनता दलाकडे जाणारी मुस्लीम मतेही काँग्रेसच्याच पारड्यात पडली. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा