शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Karnatak Election: "काँग्रेसची वॉरंटी संपलीय, गॅरंटीही खोटी आहे", कर्नाटकात नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 13:42 IST

आपल्याला कर्नाटकला विकसित भारताचे ड्राइविंग फोर्स, ग्रोथ इंजिन बनवायचे आहे. त्यामुळे भाजपचे सरकार पुन्हा स्थापन करावे लागेल, डबल इंजिनचे सरकार आणावे लागेल, असे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले. 

बंगळुरू : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या प्रमाणावर जनसभा होत आहेत. आज कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात एका सभेला नरेंद्र मोदींनी संबोधित केले. यावेळी स्वातंत्र्याच्या 'अमृत काल'मधील कर्नाटकची ही पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक कर्नाटकला नंबर वन राज्य बनवण्याची निवडणूक आहे. येत्या 25 वर्षात कर्नाटक विकासाच्या कोणत्या उंचीवर जाईल, हे ही निवडणूक ठरवेल. आपल्याला कर्नाटकला विकसित भारताचे ड्राइविंग फोर्स, ग्रोथ इंजिन बनवायचे आहे. त्यामुळे भाजपचे सरकार पुन्हा स्थापन करावे लागेल, डबल इंजिनचे सरकार आणावे लागेल, असे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले. 

काँग्रेसचा इतिहास दहशतवादाचा आणि दहशतवाद्यांच्या तुष्टीकरणाचा आहे. दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली, तेव्हा दहशतवाद्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक झाल्यावर काँग्रेसने देशाच्या सैन्यदलाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेसची वॉरंटी संपली आहे, काँग्रेसची विश्वासार्हता संपली आहे. अशा परिस्थितीत वॉरंटीशिवाय काँग्रेसची गॅरंटी सुद्धा तितकीच खोटी आहे आणि खोट्या गॅरंटीचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड खूप जुना आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

कर्नाटकच्या जनतेला काँग्रेस आणि जेडीएस या दोघांपासून सावध राहावे लागेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस आणि जेडीएस हे दिसायला दोन पक्ष आहेत, पण ते दोघेही मनापासून आणि कृतीने सारखेच आहेत. दोघेही कुटुंबवादी आहेत, दोघेही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात आणि दोघेही समाजात फूट पाडण्याचे राजकारण करतात. कर्नाटकच्या विकासाला या दोन्ही पक्षांचे प्राधान्य नाही, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस-जेडीएसच्या चुकीच्या कारभाराचा पुरावा म्हणजे अप्पर भद्रा सिंचन प्रकल्प. त्यांना शेतकऱ्यांची काळजी नव्हती, म्हणून त्यांनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. भाजपच्या डबल इंजिन सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या विकासकामांशी काँग्रेस कधीही स्पर्धा करू शकत नाही. 2014 पूर्वी काँग्रेसने 10 वर्षांत जेवढी वैद्यकीय महाविद्यालये बांधली, भाजप सरकारने केवळ 9 वर्षांत दुप्पट वैद्यकीय महाविद्यालये बांधली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींकडून भाजपच्या जाहीरनाम्याचे कौतुकभाजपच्या जाहीरनाम्याचे कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मी राज्य भाजपच्या टीमचे आणि कर्नाटक भाजपच्या नेतृत्वाचे जाहीर अभिनंदन करतो. काल त्यांनी जे संकल्प पत्र जाहीर केले आहे, ते अतिशय चांगले संकल्प पत्र घेऊन आले आहेत. त्यात कर्नाटकला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा रोड मॅप आहे, त्यात आधुनिक पायाभूत सुविधांची ब्लू प्रिंट आहे, त्यात महिलांच्या सक्षमीकरणावर भर आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस