शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

'मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर काही नको' यावर ठाम होते डीके शिवकुमार; गांधी परिवाराने सोडवला कर्नाटकचा गुंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 11:25 IST

गेल्या दोन दिवसापासून कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

गेल्या दोन दिवसापासून कर्नाटककाँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अनेक बैठका घेऊन काँग्रेसनेकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडवला. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि प्रदेश काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. मात्र, डीके शिवकुमार काल सायंकाळपर्यंत 'मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर काहीही नको' या आपल्या आग्रहावर ठाम होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांना उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेशाध्यक्षांसह महत्त्वाच्या मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी  मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. 

ST चे पहिले कंडक्टर लक्ष्मण केवटे यांचं निधन; 'जीवनवाहिनी'च्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

दुसरीकडे, सिद्धरामय्या यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांचा पाठिंबा दर्शवून मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०२४ चे समीकरण लक्षात घेऊन हायकमांडला ते मुख्यमंत्रीपदी हवे होते. ते कुरुबा समाजातून येतात आणि ओबीसी व्होट बँकसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जवळपास चार दिवसांपासून सुरू असलेली बैठकांची फेरी अखेर बुधवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीने संपली. ते सध्या शिमल्यात असून त्यांनी डीके शिवकुमार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित होते.

सोनिया गांधी यांनी डीके शिवकुमार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला

सोनिया गांधी यांच्याशी बोलल्यानंतर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी सहमती दर्शवली. सोनिया गांधी यांनी डीकेएस यांना सांगितले की, पक्षाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठा आणि समर्पणाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल, याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. काँग्रेसने नामनिर्देशित केलेले कर्नाटकचे तीन निरीक्षक सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह आज बेंगळुरूला जाणार आहेत, तिथे सिद्धरामय्या यांची नेता म्हणून औपचारिकपणे निवड करण्यासाठी संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. नवीन सरकारचा शपथविधी २० मे रोजी बेंगळुरूच्या कांतेराव स्टेडियमवर होणार आहे. 

डीके शिवकुमार हे गेल्या चार वर्षातील त्यांच्या कामाचा दाखला देत सर्वोच्च पदासाठी झटत होते. मंगळवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी बंगळुरू विमानतळावर पत्रकारांशी बोलताना या पदासाठी कोणालाही ब्लॅकमेल करणार नाही, असे सांगितले होते. काँग्रेस पक्षाला आईचा दर्जा देत त्यांनी आपण समर्पित कार्यकर्ता असल्याचे सांगितले होते. पक्षाचे राज्य युनिट प्रमुख डीके शिवकुमार यांनी आज संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) बैठक बोलावली आहे. त्यांनी कर्नाटकातील सर्व नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांना पत्र लिहून बेंगळुरूच्या क्वीन्स रोडवरील इंदिरा गांधी भवनात सायंकाळी ७ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या बैठकीत विधान परिषदेचे सदस्य आणि खासदारांनाही बोलावण्यात आले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटक