शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'मी 700 कोटी मागितले, येडियुरप्पा यांनी 1000 कोटी दिले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 15:01 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले आहेत.

ठळक मुद्देकर्नाटकचे अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला आहे. मी 700 कोटी मागितले, येडियुरप्पांनी 1000 कोटी दिल्याचं देखील गौडा यांनी म्हटलं आहे.मिळालेले पैसे हे विकासकामांसाठी खर्च झाले असल्याचं नारायण गौडा यांनी म्हटलं आहे.

बंगळुरू - कर्नाटकचे अपात्र ठरलेले आमदार नारायण गौडा यांनी एक मोठा दावा केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र मी त्यांच्याकडे 700 कोटी मागितले होते. मिळालेले पैसे हे विकासकामांसाठी खर्च झाले असल्याचं नारायण गौडा यांनी म्हटलं आहे. एनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'पहाटे पाच वाजता एक जण (कर्नाटकात एचडी कुमारस्वामीचं सरकार असताना) माझ्याकडे आला आणि मला येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी नेलं. जेव्हा आम्ही येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी दाखल झालो, तेव्हा ते देवपूजा करत होते. मी आत गेल्यानंतर त्यांनी बसायला सांगितलं. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन येडियुरप्पांनी केलं' अशी माहिती आमदार नारायण गौडा यांनी समर्थकांशी संवाद साधताना दिली आहे.

मी 700 कोटी मागितले, येडियुरप्पांनी 1000 कोटी दिल्याचं देखील गौडा यांनी म्हटलं आहे. 'मी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी 700 कोटी रुपये मंजूर करण्याची विनंती केली. त्यांनी 300 कोटी रुपये जास्त देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर त्यांनी तो निधी मंजूरही केला. अशा चांगल्या माणसाला आपण समर्थन देऊ नये का? मी याच कारणांमुळे पाठिंबा दिला. अपात्र ठरलेल्या आमदारांशी माझा काहीही संबंध नसल्याचंही येडियुरप्पांनी यानंतर सांगितलं' असं नारायण गौडा यांनी म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कन्नड भाषेवर जोर देत कन्नड संस्कृती रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं सांगत अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी हिंदी भाषेवरुन जर देशाला कोणती भाषा एकत्र आणू शकते ती हिंदी आहे असं वक्तव्य केलं होतं. मात्र या वक्तव्यावरुन दक्षिणेकडील अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. येडियुरप्पा यांनी ट्विट करत सांगितले आहे की, देशात सर्व भाषा एकसमान आहेत. कर्नाटकात कन्नड ही प्रमुख भाषा आहे. आम्ही कधीच कन्नड भाषेसोबत तडजोड करणार नाही. कन्नड भाषा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं त्यांनी सांगितले होते. 

 

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatakकर्नाटकBJPभाजपा