शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

काँग्रेसकडेही अमित शाह यांची रणनिती भेदणारा नेता; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:49 IST

शिवकुमार हे कर्नाटकमधील दुसरे सर्वात श्रीमंत नेते आहेत. २०१३ मधील निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवकुमार यांची संपत्ती २५० कोटी रुपये एवढी नमूद करण्यात आली होती. आता त्यांची संपत्ती ६०० कोटींवर गेली आहे. त्यांच्याकडे अलिशान रिसॉर्ट आहेत.

मुंबई – कर्नाटकमधील राजकीय वादंग थांबण्याचं नाव घेत नाहीये. कुमारस्वामी यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. राजकीय चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले डी.के. शिवकुमार कर्नाटक सरकार वाचविण्यासाठी धावून आले आहे. काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रणनिती भेदणारा नेता काँग्रेसकडेही असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, शिवकुमार यांना समोर येण्यासाठी बराच कालावधी लागला आहे.

काँग्रेसने भाजपची योजना हाणून पाडण्यासाठी शिवकुमार यांना पाचारण केले आहे. शह आणि काटशह देण्यासाठी शिवकुमार निष्णांत आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर आमदारांना भेटण्यासाठी प्रवेश मिळणार नाही हे समजल्यानंतर शिवकुमार यांनी हॉटेलच्या गेटवरच ठिय्या दिला. शिवकुमार यांना विश्वास आहे की, उशिरा का होईना, आमदार त्यांना भेटण्यासाठी राजी होईल. त्यामुळे मुंबईतील पावसात शिवकुमार छत्री घेऊन गेटवर उभे ठाकले आहेत.

कर्नाटकमधील सरकार वाचविण्यासाठी शिवकुमार यांनी दुसऱ्यांदा पुढाकार घेतला आहे. कोट्यधीश असलेले शिवकुमार यांनी याआधी कर्नाटक सरकार स्थापन करताना महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. पक्षाला कोणत्याही संकटातून काढण्याची आणि वेळप्रसंगी पक्षासाठी निधी गोळा करण्यात शिवकुमार यांचा हातखंडा आहे. ते सिद्धरमय्या सरकारमध्ये शिवकुमार हे उर्जामंत्री होते.

याआधी कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करताना आमदार फुटण्याची भिती होती. त्यावेळी शिवकुमार यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना बंगळुरूच्या बाहेर हलविले होते. तसेच विधानसभेत आणताना चोख बंदोबस्त केला होता. त्यावेळी शिवकुमार यांनी एकही आमदार फुटू दिला नव्हता. या व्यतिरिक्त सोनिया गांधी यांचे विश्वासू अहमद पटेल यांची गुजरातमधून राज्यसभा निवडणुकीत पराभवाची शक्यता होती. त्यावेळी काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता होती. मात्र शिवकुमार यादव यांनी सर्व आमदारांना आपल्या रिसॉर्टमध्ये हलवून अहमद पटेल यांचा राज्यसभेचा मार्ग सुकर केला होता.

शिवकुमार यांचे महाराष्ट्र कनेक्शन

शिवकुमार यांनी २००२ मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचे सरकार वाचविण्यासाठी मोठी खेळी केली होती. विलासराव देशमुख यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी शिवकुमार यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईहून बंगळुरूला नेले होते. त्यामुळे सर्व आमदार एकत्र ठेवण्यास काँग्रेसला यश आले होते. एकूणच भाजपच्या अमित शाह यांच्या राजकीय डावपेचांना शह देण्याची क्षमता असलेला नेता काँग्रेसकडे देखील आहे. परंतु, शिवकुमार यांना म्हणावी तशी संधी अद्याप मिळाली नाही. 

शिवकुमार यांच्या अलिशान रिसॉर्टची काँग्रेसला मदतच

शिवकुमार हे कर्नाटकमधील दुसरे सर्वात श्रीमंत नेते आहेत. २०१३ मधील निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवकुमार यांची संपत्ती २५० कोटी रुपये एवढी नमूद करण्यात आली होती. आता त्यांची संपत्ती ६०० कोटींवर गेली आहे. त्यांच्याकडे अलिशान रिसॉर्ट आहेत. त्या रिसॉर्टच्या मदतीने शिवकुमार काँग्रेसची मदत करतात. गुजरातमधील काँग्रेस आमदार फुटत असताना शिवकुमार यांनी ४४ आमदारांना त्यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवले होते.