शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:29 IST

Karnatak Congress: राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या दाव्यावर टीका करणे काँग्रेसच्या मंत्र्यांना चांगलेच महागात पडले.

Karnatak Congress: काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी सोमवारी निवडणूक आयोगाविरुद्ध मोठे निदर्शने केली. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत आहेत. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत कर्नाटक सरकारचे सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी राहुल गांधी आणि पक्षाच्या विचारसरणीपेक्षा वेगळे विधान केले. राजन्ना यांनी म्हटले की, मतदार यादी काँग्रेसच्या राजवटीत तयार करण्यात आली होती. मात्र, हे विधान मंत्री राजन्ना यांना महागात पडले आहे. काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजन्ना यांचा राजीनामा घेतला आहे.

केएन राजन्ना काय म्हणाले?कर्नाटकचे सहकार मंत्री आणि काँग्रेस नेते के.एन. राजन्ना यांनी रविवारी तुमकुरु येथे बोलताना राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर टीका केली. ते म्हणाले, "असे बोलण्याची गरज नाही. मतदार याद्या कधी बनवण्यात आल्या? या याद्या काँग्रेसच्या राजवटीत बनवण्यात आल्या आहेत. त्यावेळी कोणी का बोलले नाही? डोळे का मिटले होते? जर मी आता जास्त बोललो तर परिस्थिती आणखी बिघडेल. भाजपने चूक केली, हे खरंय. हे नाकारता येत नाही. पण हे सर्व आपल्या डोळ्यांसमोर घडले, हे देखील विचार करण्यासारखे आहे, अशी टीका राजन्ना यांनी केली होती"

'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात

राहुल गांधी चिडलेमुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे मंत्री केएन राजन्ना यांच्या विधानावर राहुल गांधी खूप संतापले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्र्यांना हायकमांडकडून स्पष्ट सूचना मिळाल्या होत्या की, राजन्ना यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढून टाकावे लागेल. त्यानुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजन्ना यांचा राजीनामा घेतला आहे. राजन्ना राजीनामा देण्यास तयार नव्हते, परंतु मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळपर्यंतची मुदत दिली आणि सांगितले की, जर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नाही, तर त्यांना काढून टाकले जाईल. त्यानंतर राजन्ना यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnatakकर्नाटक