कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा गोंधळ! मुख्यमंत्रीपदानंतर आता खातेवाटपावरुन रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 09:48 AM2023-05-23T09:48:19+5:302023-05-23T09:49:21+5:30

कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन गोंधळ सुरू असल्याचे समोर आले होते.

karnataka congress headache now mlas are getting over ministry | कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा गोंधळ! मुख्यमंत्रीपदानंतर आता खातेवाटपावरुन रस्सीखेच

कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा गोंधळ! मुख्यमंत्रीपदानंतर आता खातेवाटपावरुन रस्सीखेच

googlenewsNext

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. कर्नाटकातकाँग्रेसने मोठा विषय मिळवत सत्ता स्थापन केली.पण, मुख्यमंत्रीपदावरुन सिद्धारामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर गांधी परिवाराने मध्यस्थी करत मुख्यमंत्रीपदाचा गोंधळ मिटवला. पण, आता खाते वाटपावरुन गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे. 

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे म्हणणे आहे. डीके शिवकुमार यांनी इच्छुकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात सत्तावाटपाचा कोणताही फॉर्म्युला झाला नसल्याचा दावा ज्येष्ठ नेते एम.बी.पाटील यांनी केला आहे.

म्हाडा लॉटरीत सर्वात स्वस्त घर २५ लाखाचे तर महाग घराची किंमत ऐकून चक्करच येईल

काँग्रेसचे सरचिटणीस आणि ६ वेळा आमदार राहिलेले दिनेश गुंडू राव, भद्रावतीचे आमदार बीके संगमेश्वर यांच्यासह अनेक नेते नाराजी व्यक्त करत आहेत. संगमेश्वर म्हणाले की, माजी सभापती कागोडू थिम्मप्पा यांच्यानंतर मी चार वेळा आमदार आहे आणि शिवमोग्गामधून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. मी सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि पक्षाला माझे योगदान समजून घेण्याचे आवाहन करतो.

२००८ आणि २०१८ मध्ये त्यांना पहिल्यांदा भाजपकडून कथितपणे ऑफर आल्याची आठवणही त्यांनी करून दिली, पण त्यांनी काँग्रेस सोडली नाही. राव म्हणाले की, २०१९ मध्ये १५ आमदारांचा पक्ष बदलण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. मी माझे काम करू शकलो नाही असे नाही, कारण माझ्या नजरेखाली हे पक्ष बदलले.

सिद्धरामय्या यांनी शनिवारी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबतच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पूर्ण झाले असून १३ मे रोजी मतमोजणी झाली आहे. काँग्रेसने २२४ पैकी १३५ जागा जिंकल्या, तर भारतीय जनता पक्षाला ६६ आणि जनता दल (सेक्युलर) फक्त १९ जागांवर समाधान मानावे लागले.

Web Title: karnataka congress headache now mlas are getting over ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.