शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचा आवाज ऐकणारे ह्रदय नसेल तर 56 इंचांची छाती असून उपयोग नाही- सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:30 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकातील विद्यमान सिद्धरामय्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

मैसूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 साली लोकसभेची निवडणूक दोन मतदारसंघातून लढवण्याची काय गरज होती, असा सवाल काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या चामराजनगर येथील सभेत सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वत:साठी 2+1 असे सूत्र करण्यात आले आहे. त्यानुसार सिद्धरामय्या यांच्यासाठी दोन तर त्यांच्या मुलासाठी एका मतदारसंघाची तजवीज केली जाते. या टीकेला प्रत्युत्तर देताना सिद्धरामय्या यांनी मोदींवर पलटवार केला. मी दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असल्यामुळे मोदी माझ्यावर टीका करतात. परंतु,  2014 मध्ये नरेंद्र मोदींनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना हरण्याची भीती वाटत होती का, असा सवाल सिद्धरामय्या यांनी विचारला. तसेच त्यांनी गरिबीच्या मुद्द्यावरूनही मोदींना लक्ष्य केले. तुमच्याकडे गरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल तर नुसती 56 इंचांची छाती असून उपयोग नसतो, अशी टीकाही सिद्धरामय्या यांनी केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकातील विद्यमान सिद्धरामय्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. संसदेत १५ मिनिटे बोलण्याची मुभा द्या, पंतप्रधान मोदींचे तोंड बंद करू, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावर कागदाचा एकही तुकडा न घेता, इंग्रजी, हिंदी अथवा तुमच्या मातृभाषेत फक्त १५ मिनिटे भाषण करून दाखवा, १५ मिनिटेच राज्य सरकारच्या कामाबाबत माहिती द्या, असे खुले आव्हानच मोदी यांनी राहुल गांधींना दिले होते. 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी