शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Karnataka Floor Test : जनादेश आम्हाला, बहुमताअभावी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 00:44 IST

येडियुरप्पा यांचे भाषण : १५0 जागा मिळवून भाजपा विजयी होईल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करणे अशक्य असल्याचे लक्षात आलेल्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी विश्वासदर्शक ठराव न मांडताच राजीनाम्याची घोषणा केली. त्याप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी राज्यातील जनतेने भाजपलाच सर्वाधिक जागा दिल्या होत्या, काँग्रेस व जनता दलाला नाकारले होते, असा दावा केला. पण आम्हाला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११३ जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. अर्थात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील आणि भाजपा १५0 हून अधिक जागा मिळवून विजयी होईल, असेही ते म्हणाले.तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या येडियुरप्पा यांना अवघ्या अडीच दिवसांतच राजीनामा द्यावा लागला. तरीही मी राज्यभरात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. जनतेचे प्रेम जिंकण्यात मी यशस्वी झालो, जनतेने आमच्या प्रयत्नांना साथ दिली, असा दावा करीत त्यांनी राज्यातील साडेसहा कोटी जनतेला वंदन केले. ते म्हणाले की, मी शेवटच्या श्वासापर्यंत कर्नाटकच्या विकासासाठी, शेतकरी-गरीब जनतेसाठी लढत राहीन, पुन्हा जनतेत जाऊन विजय मिळवेन.माझ्याकडे १०४ आमदार आहेत. राज्याच्या जनतेने काँग्रेस-जेडीएसला नाकारले. त्या दोघांना जनादेश नाही. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आमचा सर्वात मोठा पक्ष असल्यानेच राज्यपालांना मला सरकार स्थापनेसाठी बोलावले, असे सांगून येडियुरप्पा म्हणाले की, आज माझी अग्निपरीक्षा आहे. संघर्ष माझ्यासाठी नवा नाही. आतापर्यंत मी अनेक लढाया लढलो आहे. मी राज्याच्या जनतेला आश्वासन देतो की जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत सगळीकडे जाईन, पुन्हा जिंकून येईन. निवडणुका कधी होतील माहीत नाही. पाच वर्षांनी होतील वा लगेचही होऊ शकतील. त्यावेळी भाजपाला १५० जागा मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन.सर्वच आमदारांना अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करण्याचे आवाहन मी केले होते. पण त्यांनी सदस्यांना बंदिस्त करून ठेवले. कुटुंबीयांपासून दूर ठेवले. ते मला पाहवले नाही. अशा पद्धतीने मी काम करूच शकत नाही, असे नमूद करून ते म्हणाले की, सत्तेत असलो वा नसलोे तरी मी लढतच राहीन. लोकशाहीमध्ये मतदार हाच राजा असतो. त्याने दिलेला निर्णय मला मान्य आहे. जनतेने जे प्रेम मला दिले, ते मी कधीच विसरू शकणार नाही.राज्यातील शेतकºयांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे मी ठरवले होते. तशी घोषणाही केली होती. ती आता अंमलात येणार नाही. दीड लाख शेतकºयांसाठी पाण्याची व्यवस्था देण्याची माझी योजना होती. सहा नद्या जोडून पाण्याची समस्या दूर करण्याचे मी ठरवले होते. मी शेतीमालाला किमान आधारभूत किंमतही देणार होतो. पण माझ्याकडे स्पष्ट बहुमत नसल्याने मला राजीनामा द्यावा लागत आहे. मात्र लोकसभेच्या कर्नाटकातील २८ पैकी २८ जागा आम्ही जिंकू, असे ते म्हणाले. स्पष्ट बहुमत नसल्याने मी विश्वासदर्शक ठराव मांडण्याऐवजी राज्यपालांकडे जाऊ न पदाचा राजीनामा देत आहे, असे सांगताना येडियुरप्पा काहीसे भावनाविवश झाल्याचे दिसत होते.राष्ट्रगीत सुरू असताना अध्यक्ष, आमदार बाहेरविधानसभेचे कामकाज संपताना राष्ट्रगीत होते. पण भाषणाद्वारे राजीनाम्याची घोषणा करून येडियुरप्पा राष्ट्रगीत होण्याआधी निघून गेले. त्यांच्यापाठोपाठ अनेक आमदारही निघाले. राष्ट्रगीत सुरू असताना हंगामी अध्यक्ष के. जी. बोपय्या व भाजपाचे आमदार सभागृहातून बाहेर पडत होते. काँग्रेसचे काही आमदारही त्यावेळी बाहेर पडताना दिसत होते.काँग्रेस, भाजपाचे बडे नेते गॅलरीतविश्वासदर्शक ठरावावर कसे मतदान होईल, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र जेवणाच्या सुटीनंतर सभागृहाचे कामकाज होण्यापूर्वीच येडियुरप्पा यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्याचवेळी राजीनाम्याचा निर्णय झाला होता.विश्वासदर्शक ठराव मांडण्याआधी येडियुरप्पा भाषण करणार असल्याचे स्पष्ट झाले, तेव्हाच ते थेट राजीनाम्याची घोषणा करणार असल्याचा अंदाज सर्वांना आला. तरीही विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी गॅलरीत गर्दी झाली होती. राज्यपालांच्या पाहुण्यांसाठी असलेल्या गॅलरीत लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद, सरचिटणीस अशोक गेहलोत तसेच केंद्रीय मंत्री अनंतकुमार व येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीय असलेल्या उषा करंदलाजे बसल्याचे दिसत होते. कामकाजाआधी त्यांच्या विनोद, गप्पा सुरू होत्या.

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Yeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा