शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 08:56 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जागा परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरीटीला पत्र लिहिले आहे. त्यांनी MUDA च्या जागा परत करण्याची ऑफर दिली आहे.  MUDA आयुक्तांना पत्र लिहून त्यांना वाटप केलेले १४ भूखंड परत करणार असल्याचे सांगितले आहे. पार्वती म्हणाल्या की, ३ एकर आणि १६ गुंठे जमिनीच्या बदल्यात वेगळ्या ठिकाणी दिलेले १४ भूखंड परत करायचे आहेत, असं यात म्हटले आहे. 

Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?

पत्रात लिहिले आहे की, 'मी भूखंडांचा ताबा म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंटला परत देत आहे. कृपया MUDA ने लवकरात लवकर याबाबत आवश्यक पावले उचलावीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात ईडीने गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकायुक्तांच्या एफआयआरची दखल घेत ईडीने MUDA प्रकरणात मुख्यमंत्री, त्यांची पत्नी पार्वती आणि इतर काही जणांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने MUDA द्वारे पर्वती यांना १४ भूखंड वाटपातील अनियमिततेबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेली मंजुरी कायम ठेवली होती. यानंतर बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने या प्रकरणाची लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले. लोकायुक्तांनी सीएम सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती, त्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू यांची नावे एफआयआरमध्ये नोंदवली आहेत. आता ईडीनेही या प्रकरणात तपास सुरू केला आहे. ईडीने सिद्धरामय्या यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना गेल्या आठवड्यात मोठा धक्का बसला. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती, यात त्यांनी राज्यपाल यांनी त्यांच्यावर खटला चालवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मात्र, सीएम सिद्धरामय्या यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग अद्याप खुला आहे.

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस