शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

यूपीबाहेर 'असं' पहिल्यांदाच घडलं; कर्नाटकच्या मंत्रिमंडळात 'हत्ती'चं पाऊल पडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 15:59 IST

कर्नाटकमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

बंगळुरु: कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न होत आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या उपस्थितीत राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कुमारस्वामी यांचे भाऊ एच. डी. रेवाना यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. याशिवाय बहुजन समाज पक्षाच्या एका आमदारानंही मंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटकमध्ये बसपाचा एकच आमदार निवडून आला आहे. त्यालाही काँग्रेस, जेडीएसनं मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मायावती यांच्या पक्षाचा एकच उमेदवार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झाला. बसपाच्या तिकीटावर एन. महेश निवडून आले. त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशबाहेर कोणत्याही राज्याच्या मंत्रिमंडळात बसपाला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी उत्तर प्रदेश वगळता बसपाला कोणत्याही राज्यात मंत्रीपद मिळालेलं नाही. कर्नाटकमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी मोठी भूमिका बजावली होती. भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यावर मायावतींनी थेट काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना फोन केला होता. तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला काँग्रेसनं पाठिंबा द्यावा, असा सल्ला मायावती यांनीच सोनिया यांना दिला होता. कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेच्या चाव्या मिळू नये, यासाठी मायावतींनी जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशीही संपर्क साधला होता. काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारण्याचा सल्ला मायावतींनी देवेगौडा यांना दिला. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला कर्नाटकमध्ये सत्ता मिळवता आली नाही. याचंच बक्षीस बसपाला मिळालं आहे. केवळ एक आमदार निवडून येऊनही बसपाला कर्नाटकमध्ये मंत्रीपद मिळालं आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीkumarswamyकुमारस्वामी