कर्नाटकमधून एक अजब घटना समोर आली आहे. रायबाग तालुक्यातील खंडल गावात असलेल्या 'हुलीकंटेश्वर' मंदिराच्या दानपेटीत मंदिर कर्मचाऱ्यांना एक अशी चिठ्ठी सापडली, जी पाहून सर्वच जण अवाक झाले. १०० रुपयांच्या नोटेसोबत एक मेसेज लिहिला होता आणि त्यामध्ये देवाकडे एक विचित्र मागणी करण्यात आली होती.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मंदिरात नुकतीच जत्रा पार पडली होती. जत्रा संपल्यानंतर जेव्हा दानपेटी उघडून त्यातील पैसे मोजले जात होते, तेव्हा ही नोट समोर आली. कागदावर लिहिले होतं की, "देवा, माझं दुःख दूर कर... माझी सासू पुढच्या वर्षीच्या जत्रेआधी मरू दे." हा मेसेज वाचून मंदिर व्यवस्थापनही चक्रावून गेलं. साधारणपणे भक्त दानपेटीत सुख-शांती, नोकरी, संतती, पैसा, आरोग्य किंवा कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रार्थना करतात. मात्र एखाद्याच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करून ती देवासमोर मांडणं हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं.
मंदिर प्रशासनाने सांगितले की, हा मेसेज नेमका सुनेने लिहिला आहे की जावयाने, हे समजू शकलेलं नाही, कारण नोटवर कोणतंही नाव किंवा ओळख नव्हती. आपल्या नोकरीच्या अनेक वर्षांच्या प्रवासात अशा प्रकारची 'नवस' किंवा मागणी कधीच पाहिली नसल्याचंही त्यांनी मान्य केलं. ही घटना समोर येताच गावात चर्चेला उधाण आलं आहे. लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
काही जण याला गंभीर कौटुंबिक तणावाचा परिणाम मानत आहेत, तर काही जण हा प्रकार थट्टा किंवा रागाच्या भरात केला असावा असं म्हणत आहेत. सोशल मीडियावरही हा मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या मते, ते या चिठ्ठीला केवळ एक "विचित्र प्रार्थना" मानून सोडून देत आहेत, कारण हा काही तपासाचा विषय नाही. प्रत्येक भक्त आपल्या भावनांनुसार दानपेटीत काही ना काही अर्पण करत असतो, हा मेसेजही त्याचाच एक भाग आहे, फक्त तो थोडा वेगळा आणि धक्कादायक आहे.
Web Summary : A bizarre note found in a Karnataka temple donation box requested God to kill the devotee's mother-in-law before next year's festival. The unusual prayer has sparked widespread discussion and varied reactions in the village.
Web Summary : कर्नाटक के एक मंदिर के दानपेटी में एक अजीब चिट्ठी मिली जिसमें भक्त ने भगवान से अगली साल के त्योहार से पहले अपनी सास को मारने की प्रार्थना की। इस असामान्य प्रार्थना ने गांव में व्यापक चर्चा और विविध प्रतिक्रियाएं उत्पन्न की हैं।