शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील ५२ किलो सोन्यावर डल्ला, घटनास्थळी काळी बाहुली ठेवली, देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीमुळे खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:00 IST

Karnataka Bank Heist: कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून ५२ किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली आहे. चोरट्यांनी कॅनरा बँकेतील शाखेमधून सोन्याची चोरी केली.

कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील एका बँकेमधून ५२ किलो सोन्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. ही चोरी देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनेपैकी एक घटना ठरली आहे. चोरट्यांनी कॅनरा बँकेतील शाखेमधून सोन्याची चोरी केली. ही घटना मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात घडली. मात्र या प्रकरणी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही.  पोलिसांकडून या प्रकरणी कसून तपास सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही चोरी विजयपुरा जिल्ह्यातील मनगुली येथीलल कॅनरा बँकेच्या शाखेमध्ये २३ मे रोजी झाली होती. मात्र ही चोरी २६ मे रोजी बँकेचे कर्मचारी कामावर परतले तेव्हा उघडकीस आली. चोरट्यांनी ५२ किलो सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र या चोरट्यांनी दागिन्यांवर नेमका डल्ला कसा काय मारला हे पोलिसांनी आतापर्यंत समजू शकलेलं नाही.

विजयपुराचे एसपी लक्ष्मण निंबर्ही यांनी सांगितले की, सोन्याचे दागिने हे २३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून २५  मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान, चोरण्यात आले होते. आम्ही आरोपींना पकडण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत. तसेच या गुन्ह्यामध्ये ६ ते ८ लोक सहभागी असल्याचा आम्हाला संशय आहे. तर आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही चोरी आदीपासून निश्चित होती. चोरट्यांनी चोरी करण्यासाठी एका लाँग विकेंडची वाट पाहिली. त्यानंतर चोरट्यांनी बँकेतील सोन्यावर डल्ला मारला.

पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्यासाठी बनावट चावीचा वापर केला. त्यांनी अलार्म बंद केला. तसेच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बंद केले. तसेच चोरटे बँकेतील नेटवर्क व्हिडीओ रेकॉर्डरसुद्धा घेऊन गेले. त्यांनी केवळ बँक लॉकर उघडले आणि त्यातील सोनं घेऊन गेले. आश्चर्याची बाब म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळी एक काळ्या रंगाली बाहुली ठेवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सोन्याच्या चोरीसाठी याआधीही बँकांना लक्ष्य केले गेले आहे. गतवर्षी २८ ऑक्टोबर रोजी एका टोळीने दावणगेरे जिल्ह्यातील न्यामती शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून १३ कोटी रुपयांचे दागिने चोरले होते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकbankबँकRobberyचोरी