'कर्नाटकात विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका अटळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 04:45 AM2019-06-22T04:45:43+5:302019-06-22T04:45:56+5:30

देवेगौडा यांचा दावा; सरकार टिकविणे कुमारस्वामी यांच्या हाती नाही

'Karnataka assembly elections are inevitable' | 'कर्नाटकात विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका अटळ'

'कर्नाटकात विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका अटळ'

Next

बंगळुरू : कर्नाटकात विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होणे अटळ आहे, असे सांगून माजी पंतप्रधान व जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी राज्यातील एच. डी. कुमारस्वामी सरकार फार काळ टिकणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसने राज्यात सरकार चालविण्यासाठी आम्हाला पाच वर्षे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते, पण काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे वागणे पाहता, हे सरकार पाच वर्षे टिकेल, असे आपणास वाटत नाही. माझ्या मुलाने (कुमारस्वामी) राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारू नये, असे माझे म्हणणे होते. काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी आमच्यावर दबाव आणला होता, असा दावा त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

सुचविले होते खरगेंचे नाव
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी आपण काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुचविले होते, असा दावा करून देवेगौडा म्हणाले की, पण त्यानंतर गुलाम नबी आझाद मला भेटण्यात आले आणि कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, आम्ही सरकारला पाच वर्षे पाठिंबा देऊ , असे त्यांनी मला सांगितले होते.

Web Title: 'Karnataka assembly elections are inevitable'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.