शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections 2018 : फ्लॅटमधून 10 हजार बनावट ओळखपत्रं जप्त, राजराजेश्वरी मतदारसंघातील निवडणूक स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 09:14 IST

कर्नाटकमधील राजराजेश्वरी नगर विधानसभा क्षेत्रातील एका फ्लॅटमध्ये बनावट मतदार ओळखपत्र सापडल्यानं निवडणूक आयोगाकडून या मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

बंगळुरू - कर्नाटकमधील राजराजेश्वरी नगर विधानसभा क्षेत्रातील एका फ्लॅटमध्ये बनावट मतदार ओळखपत्र सापडल्यानं निवडणूक आयोगाकडून या मतदारसंघातील मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या जागेवार आता 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.  8 मे रोजी आर.आर.नगर मतदारसंघाचील एका फ्लॅटमध्ये जवळपास 10,000 बनावट मतदार ओळखपत्रं सापडली होती. दरम्यान, हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते. 

मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत, निवडणूक आयुक्त सुनील अरोडा आणि अशोक लवासा यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेत. 'आर.आर.नगर मतदारसंघात मतदारांना पैसे, महागड्या वस्तू आणि अन्य वस्तूंचं वाटप करण्यात आल्याची तक्रार मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी मतदारांना प्रलोभन देणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यासही सुरुवात केली.'

यातील दोन घटना गंभीर असल्याचे सांगत निवडणूक आयोगानं या जागेवरील मतदानाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 6 मे रोजी एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात सामान जप्त करण्यात आले. या सामानाची किंमत जवळपास 95 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. तर याच विधानसभा क्षेत्राच्या जलहल्ली परिसरात छापेमारीदरम्यान एका फ्लॅटमध्ये बोगस मतदार ओळखपत्रं आढळून आली.

 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस