शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: महिलांनो आम्हाला फक्त तुमची मतं हवीत, तुम्ही नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 11:13 IST

भाजपाने केवळ ६  व काँग्रेसने १५ महिलांना पक्षाचे तिकीट दिले आहे.

बंगळुरु- महिला सबलीकरण करु, निर्णय प्रक्रीयेत महिलांना स्थान हवे असे राजकीय पक्ष सांगत असले तरी त्यांचं प्रत्यक्ष वर्तन मात्र याच्या अगदीच उलट आहे. महिलांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी राजकीय पक्ष काहीच करत नसल्याचे कर्नाटक विधानसभेसाठी लढणाऱ्या उमेदवारांच्या यादीवरुन दिसते.

एकूण ३३७४ उमेदवारांमध्ये केवळ ७% उमेदवार महिला आहेत. भाजपाने केवळ ६  व काँग्रेसने १५ महिलांना पक्षाचे तिकीट दिले आहे. कर्नाटक विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी ४८% मतदार महिला आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा यात १३% इतकी वाढ झाली आहे. मात्र तरिही राजकीय पक्षांना महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे असे वाटत नाही. आपल्या पक्षातर्फे जास्तीत जास्त महिलांनी विधानसभेत जावे असे कोणत्याही पक्षाला मनापासून वाटत नसल्याचे उमेदवारांच्या आकडेवारीकडे पाहिल्यावर लक्षात येते.

महिलांना पक्षाचे तिकीट द्यायला मागे हटणारे पक्ष महिलांची मते मिळवण्यासाठी मात्र वाटेल ते करायला तयार आहेत. कर्नाटकात मतांसाठी स्वयंपाकाची भांडी, सोने, पैसे , तांब्याची भांडी, प्रेशर कुकर, साड्या अशा वस्तू वाटायला सुरुवात झाली आहे. निर्वाचन आयोगाने १.७६ कोटी रोख, १५ लाख किमतीच्या चांदीच्या वस्तू, २६८ तांब्याची भांडी या प्रचारकाळात जप्त केली आहेत, या सर्व वस्तू- पैसे लोकांमध्ये वाटण्यासाठी वापरले जात होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात १६.२८ कोटी रुपयांचे कुकर व साड्या जप्त करण्यात आल्या. बेंगरुळु येथील काँग्रेस उमेदवार एम. मुनिरत्न यांच्याविरोधात पक्षाचे चिन्ह व इतर माहिती छापलेल्या खोक्यांमधून साड्या, तवे व९६ कुकर वाटल्याचा आरोप ठेवत आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल झाली आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस