शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Election 2018: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला; 12 मे रोजी मतदान, 15 तारखेला मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 11:58 IST

या निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर होणार आहे. 

बंगळुरू: काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार 12 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. संपूर्ण निवडणूक एकाच टप्प्यात पार पडेल. त्यानंतर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. या निवडणुकीत 4 कोटी 96 लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर होणार आहे. 

कर्नाटक हे काँग्रेसची सत्ता असलेल्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे काँग्रेसच्यादृष्टीने ही अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर आपल्या काँग्रेसमुक्त भारत या ध्येयाच्या आणखी जवळ जाण्यासाठी या निवडणुकीत भाजपाकडून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. याशिवाय, या निवडणुकीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मुव्हमेंटम सेट होण्याची शक्यता आहे. अशा अनेक अर्थांनी कर्नाटक विधानसभेची निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

 

कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपुष्टात येत आहे. 225 सदस्यांच्या विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. दरम्यान, निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावून रिंगणात उतरले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे, बी.एस. येडियुरप्पांना यांना मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा बनवून भाजपानं प्रचाराच्या मैदानात उडी घेतली आहे. तर जेडीएस व बसपा आघाडी करुन निवडणूक लढवणार आहेत.   

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस