Karnataka Assembly Elections 2018 : भाजपाच्या जाहिराती, होर्डिंग्जला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:21 IST2018-05-04T05:21:03+5:302018-05-04T05:21:03+5:30
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या जाहिराती व होर्डिंग्जविरुद्ध गुरुवारी सायंकाळी काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी केली.

Karnataka Assembly Elections 2018 : भाजपाच्या जाहिराती, होर्डिंग्जला आक्षेप
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या जाहिराती व होर्डिंग्जविरुद्ध गुरुवारी सायंकाळी काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाने प्रचारात वृत्तपत्रे व होर्डिंग लावून दिलेल्या जाहिरातीत राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देशभक्तांचे मारेकरी दाखवले असून हे दोघे ३८०० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसने या जाहिरातींची दखल घेऊन निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. आयोगापुढे दस्तावेजाचे पुरावे सादर करून पक्षाचे खासदार अभिषेक मनु सिंघवी, प्रमोद तिवारी व इतर नेत्यांनी हा प्रकार फौजदारी कायद्याचे उल्लंघन असून ते केवळ आचारसंहितेचे उल्लंघन नाही, असे निदर्शनास आणून दिले. काँग्रेसने आयोगाकडे हे स्पष्ट केले की, या मुद्द्यांवर आम्ही गप्प बसणार नाही व भाजपाच्या या गुन्हेगारी वर्तनाविरुद्ध प्रदेश पातळीवर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करील.