शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

karnataka assembly election: राष्ट्रवादीच्या उमेदवारीने निपाणीच्या राजकारणाला कलाटणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 19:09 IST

राष्ट्रवादीचे नेते काकासाहेब पाटील यांच्या विरोधात

दादा जनवाडेनिपाणी : युवा नेते उत्तम पाटील यांना अखेर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या या उमेदवारीने निपाणी तालुक्याच्या राजकीय समीकरणे नक्कीच कलाटणी मिळणार आहे. उत्तम पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल, असा विश्वास होता. पण काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकर्ता हाच माझा पक्ष या तत्त्वावर जोरदार तयारी सुरू केली. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तम पाटील यांना उमेदवारी देऊन निपाणीच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. निपाणीचे माजी आमदार व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांचे व शरद पवार यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे काकासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही, असा विश्वास बहुतांशी लोकांना होता. अशा बातम्या ही सर्वत्र फिरत होत्या. पण राष्ट्रवादीने उमेदवार देऊन अनेक शक्यतांना संधी उपलब्ध करून दिली आहे. उत्तम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांना राष्ट्रवादीतील नेत्यांची प्रचारासाठी मोठी साथ लाभणार आहे. निपाणी मतदारसंघात व बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल कमालीचे प्रेम व सहानुभूती आहे.  शरद पवार हे वैयक्तिक अथवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून नेहमीच सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. निपाणी मतदारसंघातील मतदारांमध्येही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने अनेक नेते प्रचाराला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रचारातही मोठी रंगत येणार आहे. या उमेदवारीने काही प्रमाणात जातीच्या समीकरणांमध्येही फरक पडणार असून मराठा, मुस्लिम व मागासवर्गीय समाजाची मते उत्तम पातीळ यांच्या पारड्यात पडू शकतात. या तिन्ही समाजांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल प्रेम आहे.कागलचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ निपाणीचे जावई आहेत.  निपाणीशी त्यांचा नेहमी असलेला स्नेह आणि येथील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली आदराची भावना ही उत्तम पाटील यांच्या पाठीशी असणार आहे. 

समिती काय करणार?महाराष्ट्र एकीकरण समितीला शरद पवार यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. मराठी भाषिकांवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्यावेळी शरद पवार यांनी मराठी भाषिकांची बाजू घेत त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. यामुळेच सीमा भागातील मराठी मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. निपाणी मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याने महाराष्ट् एकीकरण समिती त्यांच्याविरोधात लढणार की, पाठिंबा देणार हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते काकासाहेब पाटील यांच्या विरोधातयापूर्वी अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काकासाहेब पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. खुद शरद पवार यांनीही गेल्याच निवडणुकीत काकासाहेब पाटील यांचा प्रचारसाठी जाहीर सभा घेतली होती. पण यंदा ते काकासाहेब पाटील यांच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत. यामुळेही निवडणुकीच्या वातावरणात बदल होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस